वसईच्या नवघर (पूर्व) येथील प्रवेशद्वारावर साकारतेय नवीन नरवीर  चिमाजी आप्पा उद्यान !

वसई : –   
वसईच्या नवघर (पूर्व) येथील प्रवेशद्वारावर नवीन नरवीर रणवीर चिमाजी आप्पा उद्यान साकारण्यात येत असून येथील तयार होत असलेल्या या  स्वागत उद्यानात चिमाजी अप्पांचा पूर्णाकृती पुतळा प्रमुख आकर्षण ठरणार आहे.तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने नवघर पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या खाडीपूल व गोखिवरे कडून येणाऱ्या नवघर पूर्व खाडीपूल यामध्ये असणाऱ्या त्रिकोणी भूखंडावर खाडीलगत भिंत घातली, गेली व त्यामध्ये येणाऱ्या खड्यात भराव टाकून स्वागत उद्यान तयार केले होते 
त्यावेळी बहुजन विकास आघाडी चे माजी नगराध्यक्ष नारायण मानकर  व माजी बांधकाम सभापती संदेश जाधव पदावर कार्यरत असताना त्या उद्यानात नरवीर चिमाजी अप्पांची फायबरची कटआउट उभारण्यात आली होती, तर प्रत्येक वसई विजयोत्सवात म्हणजेच बुद्धपौर्णिमेला त्या कटआउटचे पूजन करून, चिमाजी अप्पाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येत असे. 
मात्र कालांतराने ऊन पावसाच्या परिणामामुळे त्या फायबर प्रतिमेचे नुकसान होऊन ती प्रतिमा खराब झाली होती.
दुसरीकडे तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर ह्यांच्या सूचनेनुसार स्वागत उद्यानात चिमाजी अप्पांचा पूर्णाकृती पुतळा व इतर आवश्यक त्या सोयीसुविधा करण्यात याव्या असे ही मधल्या काळात सांगितले गेले
किंबहुना प्रत्यक्ष वसई तालुक्याची हद्द घोडबंदर नंतर चालू होत असली तरी वसईचा किल्ला पाहावयास येणाऱ्या पर्यटकांना स्वागत उद्यानात उभारलेला पुतळा पाहून वसईच्या प्रवेशद्वारात आपण प्रवास करतो असे वाटले पाहिजे. त्यानुसार माजी महापौर नारायण मानकर व माजी स्थायी समिती सभापती संदेश जाधव यांनी पुनःश्च वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार ह्यांच्या कडून तसा आराखडा मंजूर करून त्यासाठी अंदाजे २ कोटी ९३ लक्ष रुपयांच्या कामाला मंजुरी घेतली
 त्याप्रमाणे एप्रिल २०२४ मध्ये या कामाचे भूमिपूजन ही माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे.
दरम्यान  या कामात नरवीर चिमाजी आप्पांचा पूर्णाकृती ब्रॉन्झचा (पितळेचा) पुतळा, लॉन, बगीचा फाउंटन, विद्युत रोषणाई, टॉयलेट, सुरक्षा रक्षक केबिन इत्यादी कामांचा समावेश असणार आहे.
एकुणच या उद्यान  संदर्भात मंजूर सर्व कामे पूर्ण झाल्यावर वसईच्या प्रवेशद्वाराकडील हे स्वागत उद्यान  तेथून दैनंदिन लाखोंच्या संख्येने  प्रवास करणाऱ्या त्या वसईकर व अन्य प्रवाशांचे, पर्यटकांचे खास करून  वसईचे प्रवेशद्वार म्हणून एक आकर्षण केंद्र बिंदू ठरणार आहे  असे ही शेवटी माजी महापौर नारायण मानकर ह्यांनी सांगितले.
Thanks

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!