जनतेच्या सेवेसाठी बहुजन विकास आघाडी नेहमी तत्पर – माजी महापौर नारायण मानकर

वसई :-
नागरिकांच्या निगडित असणाऱ्या मूलभूत सुविधा , त्यांना भेडसावणाऱ्या शासकीय, प्रशासकीय समस्या जाणून घेत बविआ अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच कार्य केले जात असते बहुजन विकास आघाडी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तत्पर असते असे प्रतिपादन बविआ जेष्ठ नेते व माजी महापौर नारायण मानकर यांनी वसईत केले.
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर व युवा नेते तथा माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वसई पश्चिम माणिकपूर येथील समाज उन्नत्ती मंडळ सभागृहात जेष्ठ नागरिक कार्ड , उत्पन्न दाखला तसेच अधिवास दाखला शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी शिबिरात उत्पन्न , अधिवास आणि जेष्ठ नागरिक कार्डचा एकूण २२७ जणांची लाभ घेतला काही नागरिकांची आवश्यक असणारी कागदपत्र पूर्ण नसल्याने त्यांना लाभ घेता आला नाही अन्यथा लाभार्थ्यांचा आकडा वाढला असता असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
बहुजन विकास आघाडी आयोजित विविध दाखले शिबिरा प्रसंगी माजी महापौर नारायण मानकर यांच्या समवेत माजी महापौर प्रकाश रॉड्रिग्ज , माजी सभापती वृन्देश पाटील , स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव, नितीन राऊत  यांच्यासह माजी नगरसेवक , युवा कार्यकर्ते , पदाधिकारी व बविआ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
नागरिकांना एकाच ठिकाणी दाखल्याची व्यवस्था  समाज उन्नती सभागृहात  बहुजन विकास आघाडीने केली होती त्यामुळे दाखले काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली शिबिरातून दाखले मिळाल्याने नागरिकांनी यावेळी समाधान व आनंद व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!