विरार :-
मागील आठवड्यात अचानक आलेल्या सोसाट्याचा वारा,वादळ व धुवादार पावसामुळे वसई- विरार शहर महानगरपालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली होती, त्यातच प्रत्यक्ष पावसाळ्यात त्या- त्या प्रभागातील नालेसफाई जर वेळीच झाली नाही
तर पाण्याचा निचरा होणार नाही व पावसाचे पाणी भरण्यास वाव मिळेल यासाठी लोकप्रतिनिधीनी तत्पर राहून पालिका प्रशासनाकडून वेळीच रस्ते, त्यातील खड्डे, गटारे ,उघाडया खास करून छोटी -मोठी नालेसफाई वेळीच करून घेणं आवश्यक आहे.
त्यासाठी विरार पश्चिम भागातील बहुजन विकास आघाडीच्या कार्यतत्पर माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे व त्यांचे सहकारी कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वाॅर्ड नं १४ मधील वाय. के. एन् एक्स स्टार प्लॅनेट जवळ असलेला मोठा नाला कसा व कुठल्या पध्दतीने त्याची पावसाळ्यापूर्वीच साफसफाई करता येईल
यासंदर्भात त्यांनी वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे अभियंता व कर्मचारी वर्गास सोबत घेऊन त्या नाल्याची नुकतीच पाहणी करून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.
या नालेसफाईची व अन्य पावसाळा पूर्व कामांची पाहणी करताना बबिआच्या माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे,पालिकेचे अभियंता कल्पेश, एस.आय प्रणित तेली आणि अनिल म्हात्रे आदी उपस्थित होते.
मागील आठवड्यात अचानक आलेल्या पावसाने उडवली होती दाणादाण !
निसर्ग कधी आपली ऋतु चक्रे फिरवील याचा काहीच नेम नाही त्यातच ७ जून हा पावसाचा खऱ्या अर्थाने आगमन काळ असताना व जून महिना उगवण्या आधीच मागील आठवड्यात पावसाने संबंध कोकण किनारपट्टी भागातील सर्व जिल्ह्यात धुवादार पाऊस,सोसाट्याचा वारा व बऱ्यापैकी मोठं नुकसान वसई- विरार सहित पालघर जिल्ह्यात केले होते.
![]()
