वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

वसई विरार शहर महानगरपालिकेत विवाह नोंदणी सेवा आता ऑनलाईन स्वरूपात सुरू !

 

विरार :- 

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी विवाह नोंदणी (Marriage Registration) सेवा आता ऑनलाईन स्वरूपात सुरू करण्यात आलेली आहे.

या अंतर्गत वधू किंवा वर पैकी एकजण वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करताना अर्ज इंग्रजी व मराठीत अचूक भरावा व सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अपलोड करावा. विवाह निंबधकास भेटण्याच्या दिवशी व वेळेस (Appointment Date & Time) मूळ कागदपत्रे सादर करावीत व कार्यालयास भेट देताना विवाह नोंदणीसाठी वधू, वर व तीन साक्षीदार यांच्यासह उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

रेशनकार्ड व पासपोर्टवरील पत्ता हे रहिवासाचे प्रमाण म्हणून ग्राह्य धरले जातील. घटस्फोटीत, विधवा/विधुर असल्यास त्यासंबंधीचे अधिकृत दस्तऐवज जोडणे आवश्यक आहे. शनिवार, रविवार व शासकीय सुट्ट्या वगळता नोंदणीसाठीची तारीख निश्चित करावी.

महानगरपालिकेच्या विवाह नोंदणी या ऑनलाईन सेवेचा लाभ घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मा. आयुक्त तथा प्रशासक, वसई-विरार शहर महानगरपालिका यांनी केले आहे.

विवाह नोंदणी करीता !

https://onlinevvcmc.in/app/FrmCitizenLogin.aspx या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करता येईल असे ही महापालिका जनसंपर्क अधिकारी विभागाने प्रसिद्ध केले आहे

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!