वसई :-
विरारच्या फोर्ट यंगस्टर्स क्लब च्या १२ वर्षा खालील मुलांच्या संघाने मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित भास्कर ठाकूर मेमोरीयल क्रिकेट स्पर्धेत अंतिम विजेते पद पटकवले आहे
मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित भास्कर ठाकूर मेमोरीयल १२ वर्षा खालील मुलांच्या निवड चाचणी स्पर्धेत संपूर्ण मुंबईतून १६० संघाने सहभाग घेतला होता तर या सर्वातून तब्बल ८ फेऱ्या जिंकत विरारच्या फोर्ट यंगस्टर्स क्लब संघाने निर्विवाद वर्चस्व राखत अजिंक्य पद पटकवले असल्याची माहिती संघांचे प्रशिक्षक संतोष पिंगुळकर सरांनी दिली
सामन्या विषयीं बोलताना, संतोष सरांनी अंतिम सामन्यात कर्णधार रोहन माली याने नाबाद ६० धावा करत संघाच्या १९१ धावा करत सुस्थितीत नेऊन पोचवले तर रोहनला क्रीसुव पांड्या याने ३९ धावा तर सोहम पलाई याने २१ धावा करत मोलाची साथ दिली. प्रतिउत्तरात स्पोर्टमन कल्याण चा संघ ९५ धावत गारद झाला
हर्षल सोनावणे याने ५.५ षटकात १४ धावा देत ६ गडी गारद केले, क्षेत्ररक्षणात सोहम पलाई याने ४ अप्रतिम झेल घेत १ गडी रनआऊट केला व आपल्या संघाची विजयाची वाट सुकर केली.
आणि विजेता संघ मान्यवरांकडून सन्मानित !
अंतिम सामन्याच्या बक्षीस समारंभासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अजिंक्य नाईक तसेच सचिव अभय हडप व उपसचिव दीपक पाटील व अन्य संचालक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विरार फोर्ट यंगस्टर्स संघास विजेता चषक देऊन सन्मानित करण्यात आले हर्षल सोनवणे यास अंतिम सामनावीर,तसेच सोहम पलाई याला उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले तर प्रामुख्याने विजेत्या संघांचे प्रशिक्षक म्हणून संतोष पिंगुळकर सर यांचाही सत्कार करण्यात आला.
परंतु उपविजेते पदावर समाधान मानावे
लागले होते !
या आधी मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित सी पी सी सी १४ वर्षा खालील निवड चाचणी स्पर्धेतही फोर्ट यंगस्टर्स च्या संघांनी अंतिम फेरी पर्यंत मजल मारली, परंतु त्यावेळी उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते.
![]()
