“शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रभावी काम वसई शेतकरी सोसायटी करतेंय” — उपनिबंधक अमर शिंदे

वसई :- 
सहकारात अग्रेसर असलेल्या वसई तालुक्यासह सबंध पालघर जिल्ह्यातील शेतीमालाला एक उत्तम अशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रभावी काम वसई शेतकरी सोसायटी करत आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना आपला माल ही थेट ग्राहकांना विकत असल्याने याचा मोठा फायदा शेतकरी व  ग्राहकांना ही होत असल्याचे प्रतिपादन सहकारी संस्था, वसई तालुका उपनिबंधक अमर शिंदे यांनी वसई शेतकरी सोसायटीने भरविलेल्या दुसऱ्या आंबा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.
वसई तालुक्यातील सर्वात जुन्या असलेल्या वसई शेतकरी विविध कार्यकारी सोसायटीच्या ८५ व्या वर्षाचे निमित्त साधून संस्थेच्या देवतलाव येथील आवारात आंबा महोत्सवाचे आयोजन दि १६ मे पासून ते दि १८ मे च्या दरम्यान भरवण्यात आले आहे, या आंबा महोत्सवाचे उदघाटन वसई तालुका सहकारी संस्था उपनिबंधक अमर शिंदे आणि भाजपचे महामंत्री हेमंत म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
वसई शेतकरी सोसायटीच्या आंबा महोत्सवात बोर्डी येथील यज्ञेश सावे यांनी विविध जातीचे आंबे उदा. हापूस, केशर, तोतापूरी,पायरी इत्यादी प्रकारच्या जातीचे आंबे ठेवण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे घोलवड येथील मागासवर्गीय बांधवांनी  बांबू पासून बनविलेल्या शोभेच्या वस्तूचे प्रदर्शन देखील दादा वाडेकर यांची जय अॅग्रो प्रॉडक्ट कं.माध्यमातून भरवले आहे यामध्ये शेती व बागायती साठी लागणारी अवजारे,कृपा सिंधू ऑइल मिल व सुखदा ब्रँड होळी यंकच्या लाकडी घाण्याचे तेल, स्वयंसिद्ध महिला बचतगटाद्वारे बनविलेले मसाले, लोणची, पापड इ. पदार्थ,ओंसई महिला बचतगटाद्वारे बनविलेले विविध खादय पदार्थ,विनेश धोडीया यांची वारली पेंटीग् ओराग्रीन चिकू  प्रॉडक्टस्, ड्रीम पोंवर सोल्युशन चे सोलर पॅनल,त्याच बरोबर आर्यमा फूड्स आगाशीची वसईची प्रसिद्ध सुकेळी महोत्सवाचे खास आकर्षण राहिले आहे.
या महोत्सवाला पहिल्याच दिवशी मोठा व उत्तम प्रतिसाद मिळाला आहे तर आंब्या बरोबरच सुकेळी,चिकूचे पदार्थ , लोणची आणि इतर वस्तूंना देखील  मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी  चेअरमन आशय राऊत यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले कि, वसई शेतकरी सोसायटी शेतकऱ्यांच्या उत्कर्षाला नेहमी प्राधान्य देत आली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल तसेच शेतीची हाताने बनविलेली अवजारे,त्याच प्रमाणे बांबूच्या वस्तू, चिकूचे वेवेगळे पदार्थ,मसाले आणि घाण्यापासून बनविलेले तेल आदी वस्तूंना ही या महोत्सवात चांगली मागणी मिळत आहे.
त्याचप्रमाणे वारली पेंटिंग या महोत्सवात चांगलाच भाव खात आहे असे ही चेअरमन आशय राऊत यांनी शेवटी  सांगितले,
या कार्यक्रमाला सोसायटीचे उपाध्यक्ष समीर पाटील,मानद सचिव हरेश राऊत ,आदी सर्व संचालक व इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!