स्वयंपुनर्विकासाचे शिवधनुष्य उचललेय व ते पेलवणारही असा ठाम विश्वास वसईतील शिबिरात आ.प्रविण दरेकरांकडून व्यक्त करण्यात आला असला तरी या उपक्रमात त्यांना संघर्ष कन्या म्हणून आम स्नेहा ताई व आम राजन नाईक अन्य सहकाऱ्यांची साथ लागणार आहे अर्थात या उमेदीने, स्वयंपुनर्विकासाचे “जन आंदोलन” म्हणून पुढे आलं असे संबोधित करताना स्वयंपुनर्विकास म्हणजे “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” येथे गुणवत्तेला स्थान आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यास सांगितले आहे, आणि त्यानुसार हाऊसिंग मध्ये ही आपण आत्मनिर्भर व्हायचं आहे असा नाराच या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून भाजपने जनतेला दिला आहे.

वसई :- आशिष राणे
स्वयंपुनर्विकास हे जन आंदोलन म्हणून पुढे आलंय ठाणे, पनवेल, घणसोली आदी ठिकाणी सभा, बैठका झाल्या आणि त्याठिकाणी तुडुंब गर्दी होती किंबहुना ही गर्दी माझ्यासाठी नाही तर लोकांचा स्वतः च्या घराचा ज्वलंत प्रश्न व गरज आहे त्यासाठीची होती. अर्थात शिवधनुष्य पेलवणे हे फार अवघड असते, पण स्वयंपुनर्विकासाचे हे शिवधनुष्य आम्ही उचलले आहे आणि ते पेलवणार ही आहोत, असा ठाम विश्वास भाजपा गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष आ.प्रविण दरेकर यांनी वसईत एका कार्यशाळेच्या मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केला
वसई येथे भाजपाची संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या पुढाकाराने स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आम स्नेहा ताई दुबे पंडित, नालासोपाराचे आमदार राजन नाईक, भाजपा वसई-विरार जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, वसई चे प्रांतधिकारी शेखर घाडगे, सहकार खात्याचे पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी, वसई तालुका उपनिबंधक अमर शिंदे, ठाणे हौउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी शरद काशिवले, शिवसेनेचे निलेश तेंडुलकर, राष्ट्रवादीचे राजाराम मुळीक, आरपीआयचे ईश्वर धुळे, आणि या उपक्रमाचे अभ्यासक हर्षद मोरे व टीम यांच्यासह अनेक मान्यवर व वसईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर विवेचनात आम. प्रवीण दरेकर म्हणाले की, मुंबईत असलेला स्वयंपुनर्विकास
वसईत ही झाला पाहिजे ही आर्त भावना घेऊन स्नेहा ताई दुबे पंडित आज काम करत आहेत, म्हणजे यामागे कुठलीही मोठी टेक्नॉलॉजी नाही, सायन्स नाही याशिवाय आपली सोसायटी विकसित करायची आहे म्हणून मी पैसे लावतो आणि सर्व परवानग्या ही मिळवून देतो यासाठीच केवळ आपण त्या विकासकाकडे जातो,हे जरी खरं असेल तरी मी विचार केला की,मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे त्या बँकेच्या हजारो गृहनिर्माण संस्था सदस्य देखील आहेत, मग या सोसायट्यांना आर्थिक पाठबळ (पैसे) पुरवले व सरकारने ही जर पाठबळ दिले तर कशाला विकासक हवा हा एकमेव विचार करून मी मुंबई बँकेचे कर्ज धोरण आणले. सरकारचे पाठबळ मिळणार नसेल तर या योजनेला गती मिळणार नाही हे जेव्हा लक्षात आले यासाठी सर्वप्रथम गोरेगावला नेस्को मैदानात गृहनिर्माण संस्थांची एक जम्बो परिषद घेतली.

या जम्बो परिषदेत १८ मागण्या शासनाकडे केल्या गेल्या त्यापैकी १६ मागण्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करत त्याचे थेट शासन निर्णय तात्काळ काढले, त्यानंतर स्वयंपुनर्विकासाला हळूहळू गती मिळाली आज मुंबई बँकेच्या पुढाकाराने अशा काहीं इमारती उभ्या राहिल्या देखील आहेत व त्यात सभासद राहायला ही गेले असल्याचेही दरेकर म्हणाले
दुसरीकडे दरेकर यांनी सांगितले की, कांदिवली येथील श्वेतांबरा इमारतीच्या चावी वाटप कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते या कार्यक्रमात त्यांनी स्वयंपूर्ण विकासाला गती मिळण्यासाठी आणखी काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्यानुसार केवळ ही मुंबईची गरज नसून राज्यातील सर्व शहरांची गरज झाली आहे म्हणूनच माझ्या अध्यक्षतेखाली दरेकर समिती घोषित केली गेली.
ही समिती जाहीर झाल्यावर मी महाराष्ट्रभर दौरा करून बैठका घेतल्या जो अहवाल तीन महिन्यात सादर करायचा होता तो अडीच महिन्यातच सरकार दरबारी सादर केला गेला,
उदाहरणं दयायचे झालं तर स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडपट्टीतील नागरिकांसाठी अफजलपुरकर समितीच्या माध्यमातून एसआरए योजनेची निर्मिती केली तसाच माझ्या समितीच्या माध्यमातून राज्यात स्वयंपुनर्विकास हा ताकदीने होईल असा दृढ विश्वास यावेळी दरेकरांनी व्यक्त केला
स्वयंपुनर्विकासाचे “जन आंदोलन” म्हणून पुढे आलंय !
दरेकर म्हणाले की, स्वयंपुनर्विकासाचे “जन आंदोलन” म्हणून पुढे आलं असलं तरी स्वयंपुनर्विकास म्हणजे “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” येथे गुणवत्तेला स्थान आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यास सांगितले आहे, आणि त्यानुसार हाऊसिंग मध्ये ही आपण आत्मनिर्भर व्हायचं आहे.

पाच इमारतींचे भूमिपूजन महिन्याभरात करा !
दरेकर म्हणाले की, मुंबई बँकेला काही मर्यादा आहेत १६०० प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री फडवणीस यांना विनंती केली आहे आणि या विनंती मुळे त्यांनी राज्य सहकारी बँकेला हीं सांगितल्या नुसार त्यांच्याकडून ₹ १,५०० कोटी, एनसीडीसी कडून ₹१,००० कोटी या योजनेसाठी मिळणार आहेत. त्याचबरोबर (SDFC) सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कार्पोरेशन करण्याची विनंती सरकारला केली आहे. त्याला तत्वता मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे स्वयंपुनर्विकासाचे काम गतीने होणार आहे जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे काम आपले आहे.
तसेच केंद्र सरकार, असेल आणि राज्यात आपले मुख्यमंत्री फडणवीस पाठीशी आहेत. पाच इमारती वसईत उभ्या करा तेव्हा लोकांचा या योजनेवर विश्वास निर्माण होईल, या पाच इमारतींचे भूमिपूजन महिनाभरात करा इमारत उभी राहिली की चावी वाटपासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना घेऊन येऊ असा विश्वासही आम.दरेकरांनी यावेळी दिला
संघर्षकन्या आमदार स्नेहताई दुबे पंडित यांच्यावर पालघर जिल्हाची मोठी जबाबदारी !

दरेकर अभ्यास गटाच्या पालघर जिल्ह्याची जबाबदारी सरकारी समन्वय यंत्रणा म्हणून त्यांच्या प्रमुख पदी आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार घोषणा दरेकर यांनी या कार्यक्रमात केली,तसेच महापालिकेशी समन्वय साधणे, गृहनिर्माण संस्थाना मार्गदर्शन करणे, जिल्हा बँकेकडून पतपुरवठा करणे व जी मदत लागेल ती आम स्नेहा ताई दुबें पंडित यांच्या नेतृत्वाखाली होईल जेणेकरून हा विषय मुंबईत जसा पुढे जातोय तसा तो पालघर जिल्ह्यातही पुढे जावा, वसईकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, जनतेला स्वयंपुनर्विकास विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपापल्या कार्यालयात कक्ष स्थापन करा असे आवाहनही आम.दरेकर यांनी केले.
स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून वसईकरांना पहायला मिळणार नवीन परिवर्तनाची पहाट !

आजची कार्यशाळा वसईतील त्या धोकादायक व जीर्ण झालेल्या हजारो इमारती तसेच अन्य जुन्या गृहनिर्माण संस्था साठी आहे, तसेच विकासकाकडे न जाता या संस्थामधील पदाधिकारी, सदस्यांनी नेमका या योजनेचा लाभ कसा घेता येईल त्यासाठी प्रस्ताव, संस्था स्तरावर करावयाची प्रक्रिया व तयारी कशी असेल यासाठी असून ही सर्व धडपड वसईतील नागरिकांसाठी आहे अर्थात स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून वसईकरांना नवीन परिवर्तनाची पहाट पाहायला मिळणार आहे
आम.स्नेहाताई दुबे पंडित
वसई विधानसभा सदस्या तथा आम.दरेकर अभ्यास गटाच्या पालघर जिल्ह्य सरकारी समन्वयक
![]()
