नशीब मोठा प्रसंग टळला : हौशेला मोल नाही : लिफ्टची क्षमता १० जणांची मात्र लिफ्ट मध्ये चढले १५ जण
वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित, नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांच्या सहित भाजप नेते प्रविण दरेकर आज वसईत कार्यक्रम ठिकाणी लिफ्टमध्ये अडकले आणि अक्षरशः सुरक्षा रक्षक व भाजप कार्यकर्ते व अन्य मंडळीनी प्रसंगावधान राखत लोखंडी रॉडच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा तोडून या सर्वाना सुखरूप बाहेर काढले

वसई :- आशिष राणे
महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष तथा आमदार प्रविण दरेकर हे सहकारी गृहनिर्माण संस्थाविषयी संपन्न होणाऱ्या कार्यक्रम ठिकाणी असलेल्या एका सभागृहाच्या तळमजल्यावरील लिफ्ट मध्ये तब्बल १५ मिनिटे अडकल्याची दुर्देवी घटना आज दि २० जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता वसई भागात घडली आहे
महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष तथा आमदार प्रविण दरेकर हे आज रविवारी सायंकाळी ४ वाजता वसई पश्चिमेतील कौल हेरिटेज सिटी येथील अपुलँड ग्रँड बॅन्क्वेट हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित राहण्यासाठी आले होते.
या शिबिरासाठी आलेल्या अनेक मान्यवरांमध्ये आम.दरेकर यांच्यासोबत वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे-पंडीत आणि नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक हे देखील लिफ्टमध्ये होते. दरम्यान, दरेकर हे लिफ्टमध्ये अडकल्यानंतर तात्काळ आम.दरेकर यांचे सुरक्षा रक्षक व अन्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखून लिफ्टचा दरवाजा तोडून आम.दरेकरांसहित सर्वांची सुखरूप सुटका केली.
हौशेला मोल नाही : लिफ्टची क्षमता १० जणांची मात्र लिफ्टमध्ये चढले १५ जण !
मिळालेल्या माहितीनुसार, लिफ्टची क्षमता केवळ १० जणांची असूनही त्यामध्ये १५ जण चढल्यामुळे ती वरच्या मजल्यावर न जाता ती थेट बेसमेंट मध्ये गेली खरंतर क्षमतेपेक्षा अधिक (ओव्हरलोड ) झाल्याने तांत्रिक बिघाड होऊन अखेर लिफ्टअचानक बंद पडली.परिणामी लिफ्टमध्ये अडकलेले सर्वजण तब्ब्ल १० मिनिटे चिंताग्रस्त व घामाघूम झाले.
या घटनेनंतर कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. लोंखंडी रॉडच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा अक्षरशः तोडून तो उघडण्यात आला लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी नशीब काही विपरीत घटना घडली नाही,
अखेर १० मिनीटांनतर सर्वांची व्यवस्थित सुटका झाली.
एकूणच अगदी सुरक्षितपणे लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर आम. प्रविण दरेकर आणि आम राजन नाईक आणि अन्य मंडळींनी पाणी पिऊन सुटकेचा निश्वास सोडला व थोडी विश्रांती ही घेतली.
या घटनेमुळे कार्यक्रमातही काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, मात्र पुढे स्वयंम पुनर्रविकास मार्गदर्शन शिबीर हा सहकाराचा कार्यक्रम सुरळीत पार पडला.

आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची : स्थानिक पोलीस कुठे होते ? आमदारांचे पोलीस सुरक्षा कुठे गेली होती ?
खरंतर वसई व नालासोपारा विधानसभा आमदारांना विशेष पोलीस बंदोबस्त आहे तसेच भाजपचे नेते आम. दरेकर यांनाही सुरक्षा आहे त्यात वसईत माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठे विशेष कार्यक्रम व मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असेल तर त्या आमदारांच्या व अन्य निमंत्रित पाहुणे यांच्या सुरक्षेची व कार्यक्रम स्थळ याची आवर्जून पाहणी व दक्षता घेणे आवश्यक होते मात्र ना सुरक्षा रक्षकांनी ही काळजी घेतली नाही व स्थानिक पोलिसांनी देखील याची विशेष दखल न घेतल्यानेच ही घटना घडली असावी अशी वंदिता आहे
अर्थात लिफ्ट ची नेमकी क्षमता व नेमके लिफ्ट मधून कोण जाणार याबाबत बहुधा आढावा झालाच नाही? तो घेतला गेला असता तर हा प्रकार घडला नसता.तरीही लिफ्ट मध्ये कोण कोण तिन्ही आमदार व्यतिरिक्त अजून कोण होते याबाबत अदयाप कळू शकले नाही मात्र कार्यक्रम संपल्यावर याविषयीं स्वतः आमदार स्नेहताई दुबे पंडित हे खुलासा करतील असे कळते.
![]()
