“हो…. हे खरंच शक्य आहे….
आज दि. २० जुलै सायंकाळी ४ वाजता वसई तालुक्यातील जुन्या व जीर्ण इमारतींच्या” स्वयंपुनर्विकासा”साठी कौल हेरिटेज सिटीत भव्य दिव्य मार्गदर्शन शिबिर संपन्न होतं आहे,वसईतील सहकाराला एकप्रकारे पाहिल्यादाचं नवसंजीवनी देणारा असा हा मार्गदर्शक असा अधोरेखित कार्यक्रम घरा घरात विचार नेणारा ठरणारा आहे यात अजिबात शंका नाही !

वसई :आशिष राणे
भारतीय जनता पार्टी स्वयंपुनर्विकास कृती समिती, वसई यांच्या वतीने वसई येथे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी एक भव्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर आज रविवार, दि.२० जुलै २०२५ रोजी, दुपारी ४.०० वाजता अपुलँड ग्रँड बॅन्क्वेट हॉल, कौल हेरिटेज सिटी, वसई (प.) येथे संपन्न होणार आहे.
या महत्वाच्या कार्यक्रमास स्वयंपुनर्विकासाचे प्रमुख शिल्पकार तथा मार्गदर्शक आ. प्रविण दरेकर ( गटनेते महाराष्ट्र विधान परिषद, भाजपा आणि अध्यक्ष – मुंबई बँक) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

“हो…. हे खरंच शक्य आहे… तुमच्या घराच्या जागेवर तीनपट मोठं घर मिळू शकतं!” या आश्वासक संकल्पनेवर आधारित या शिबिरात, सहकारी गृहनिर्माण संस्थांनी स्वतःच त्यांच्या इमारतीचा स्वयंपुनर्विकास करण्यासाठी नेमके काय करावे, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, कायदेशीर प्रक्रिया काय आहे , आर्थिक मदत कशी उपलब्ध करता येईल , याबद्दल ही सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिरासाठी पालघर लोकसभा खासदार डॉ हेमंत सवरा, नालासोपारा विधानसभा आमदार राजन नाईक, वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी,वसईचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, वसई तहसीलदार अविनाश कोष्टी, सहकारी संस्थाचे पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी, वसई उपनिबंधक अमर शिंदे, दि.ठाणे जि.हौ. फेडरेशन लि.अध्यक्ष सिताराम राणे, दि.ठाणे जि.मध्यवर्ती बँक कार्यकारी अधिकारी श्रीकांत पठारे, भाजपा वसई विरार शहर जिल्हा अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

दरम्यान या मार्गदर्शन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वसई तालुक्यातील सर्व नागरिकांनी आणि सहकारी संस्थांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वसई विधानसभा आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी केले आहे.
![]()
