वसई विधानसभा :- संघर्षकन्या आम.स्नेहाताई दुबे पंडित यांची विकासात्कम वाटचाल !

 

“वसईच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणाऱ्या संघर्षकन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांचे मुख्यमंत्री यांच्याकडे प्रभावी निवेदन  : निवडून आल्यापासून जुजबी पाठपुरावा”!

वसई :-आशिष राणे
वसई विधानसभेच्या संघर्षकन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी सन २०२४ महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जिंकूनं आल्यानंतर वसई-विरार परिसरातील दीर्घकालीन प्रलंबित नागरी समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष बैठकीची मागणी केली होती.

त्या मागणीला नुकतीच विधानसभा पावसाळी अधिवेशन काळात  सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्यानुसार  बुधवार, दि १६ जुलै २०२५ रोजी विधान भवन, मुंबई येथील मंत्रिमंडळ सभागृहात वसई-विरारच्या विविध प्रश्नांवर एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती,

या बैठकीत आमदार स्नेहाताईं दुबे पंडित यांनी अतिशय महत्त्वाचे विषय मांडले आणि त्यास राज्याचे मुख्यमंत्री फडवणीस यांनी उत्तम व सकारात्मक प्रतिसाद देत जवळपास सर्वच कामे व त्यांच्या अंमलबजावणीचे निर्देश बैठकीमध्ये दिल्याची माहिती आम. स्नेहा ताईं यांच्या जनसंपर्क कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

आमदार स्नेहाताई व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बोलावलेल्या विशेष अधिकाऱ्यांच्या बैठकीतं देण्यात आलेल्या वसईतील प्रलंबित मागण्या संदर्भात खालील निवेडदने देण्यात आली, ती खालीलप्रमाणे….

१) जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आरोग्य केंद्रे महानगर पालिकेकडे हस्तांतर करणे : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील जिल्हा परिषदेच्या ११६ शाळा आणि ३ आरोग्यकेंद्रे व १२ उपकेंद्रे महानगर पालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रश्न मागील कित्येक वर्षे प्रलंबित असल्याची बाआमदार पंडित यांनी मुख्यमंत्री फडवणीस यांच्या निदर्शानास आणला.

तसेच जिल्हा परिषदेकडून जागेचे मुल्य मागितले जात असल्याने हा विषय प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले यावर मुख्यमंत्री फडवणीस यांनी तात्काळ दखल घेऊन , या शाळा व आरोग्य केंद्रे विनामुल्य महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीसमोर सादर करण्याच्या सूचना दिल्या.

) महानगर क्षेत्रातील रस्ते आणि पूल:
वसई – विरार मधील अत्यावश्यक असलेले ७ फ्लायओव्हर ब्रीज आणि रस्त्या बाबतचे प्रस्ताव अनेक वर्षे एमएमआरडीए (MMRDA) कडे प्रलंबित असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे व वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा आम. स्नेहाताई दुबे पंडित यांनी मांडला.
या फ्लायओव्हर मध्ये रेंज ऑफीस चौक ,वसंत नगरी आणि एव्हरशाईन गोखीवरे रोड , माणिकपूर नाका ते भाबोळा नाका यांचा समावेश असून , ज्याठिकाणी १०० % जागा अधिग्रहीत आहे त्याची तात्काळ माहिती घेऊन या प्रकल्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश मा. मुख्यमंत्री यांनी दिले.

३) वसई-विरार मधील ४ शहरांना अंतर्गत जोडणारा रिंग रोड :
महानगर पालिकेने यापूर्वी सादर केलेल्या रिंग रोड प्रस्तावाच्या मार्गात आता बरीच बांधकामे झाली असल्याने ,

या रिंग रोडसाठी पुन्हा सर्व्हेषण आवश्यक असल्याचे आमदार  स्नेहाताई दुबे पंडित यांनी बैठकीत निदर्शनास आणले.
आमदार स्नेहाताईच्या या सूचनेला पालिका आयुक्तांनी सुद्धा सहमती दर्शविली. त्यानुसार MMRDA च्या मदतीने या रिंग रोडचा नवीन DPR तयार करावा तसेच सध्या जो रस्ता मोकळा आहे तो देखील ताब्यात घेण्याची प्रक्रिया तात्काळ करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले.

४) एसटी महामंडळाच्या जागांचा PPP तत्वावर विकास करून वाहनतळासाठी जागा निर्माण करणे
वसई – विरार शहरात वाहतुकीची कोंडी होण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले असल्याचे व आता या शहरात पार्किंग साठी जागाच नसल्याची बाब आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी बैठकीत मांडली.
यावर या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासून त्याप्रमाणे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मा. मुख्यमंत्री यांनी दिले.

५) भोगवटा प्रमाणपत्र ( O C ) नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याबाबत

वसई विरार महानगर पालिका क्षेत्रात जवळपास १५०० इमारतींच्या विकासकांनी OC साठी अर्ज केले असून फक्त ४२२ इमारतींना O C दिली असल्याचे सांगून आता मा. सुप्रिम कोर्टाच्या दि १८ / १२ / २०२४ च्या निर्णयाचा आधार घेऊन यांना पाणी दिले जात नसल्याचे तसेच ग्रामपंचायत हद्दीत OC चा प्रश्नच नसताना त्यांनाही पाण्याची जोडणी दिली जात नसलाची बाब ही आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणली.

यावेळी वसई विरार क्षेत्रात OC देण्यासाठी अभय योजना लागू करा व महानगरपालिकेची थकबाकी घेऊन त्यांना तात्काळ OC देण्यासाठी धोरण निश्चित करण्याचे तसेच CC च्या आधारे त्यांना पाणी देण्याचे आदेश  मुख्यमंत्री यांनी दिले.

 

या बैठकीत वसई-विरारच्या नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतले व त्याप्रमाणे कार्यवाहीचे आदेश दिले आहेत

या बैठकीसाठी मंत्रालयात मुख्यमंत्री यांच्या दालनात पालघर चे भाजपचे खासदार डॉ.हेमंत सवरा, नालासोपारा चे आमदार  राजन नाईक व त्या त्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!