नव्या नियुक्ती पर्यंत अतिरिक्त पदभार कोण पाहणार ?

अर्थात सहकार क्षेत्रात शंभर टक्के न्याय कुणालाच देता येत नाही.तर कोणी खुश होतो तर कोणी नाराज ही होतो, अर्धन्यायिक व्यवस्थेत अशा गोष्टी होत असतात, मात्र आपल्या “अमर ” नावा प्रमाणे च अगदी शांत स्वभाव गुणविशेष पद्धतीने त्यांनी तो वसईकरांना देण्याचा प्रयत्न जरूर केला,या कार्यकाळात त्यांनी जमेल तितका वाद मिटवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला हे देखील विसरता कामां नये, त्यामुळे काही अंशी वसईचा सहकाराचा गाढा त्यांनी बऱ्यापैकी हाकला यात अजिबात शंका नाही,
वसई :- आशिष राणे
सहकारातील अग्रेसर अशा वसई तालुका सहकारी संस्थांचे वसई तालुका उपनिबंधक अमर शिंदे यांची अखेर राज्य शासनाने तीन वर्षाचा कार्यकाळ यशस्वी रित्या पूर्ण झाल्याने नियमित बदली केली आहे, मात्र त्यांच्या जागी शासनाने अद्याप कोणाचीही नियुक्ती केली नसल्याने पुढील काही दिवस वसई तालुका उपनिबंधक म्हणून येथील कारभार कोण पाहतील ? हे मात्र अदयाप समजलेलं नाही, या संदर्भात उपनिबंधक अमर शिंदे यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही

Adv ✅
सहकारी संस्था, वसई तालुका उपनिबंधक म्हणून अमर शिंदे यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये तत्कालीन उपनिबंधक योगेश देसाई यांच्याकडून सूत्रे स्विकारली होती,
त्यानुसार त्यांनी आजवर वसई तालुक्यात तब्बल 38 महिने सेवा दिली, शांत, संयमी व अभ्यासू आणि सल्ल्यापेक्षा कृतीला प्राधान्य देताना “कभी गम कभी ख़ुशी” असे ही क्षण आले, अर्थात सहकार क्षेत्रात शंभर टक्के न्याय कुणालाच देता येत नाही.तर कोणी खुश होतो तर कोणी नाराज ही होतो, अर्धन्यायिक व्यवस्थेत अशा गोष्टी होत असतात, मात्र आपल्या स्वभाव गुणविशेष पद्धतीने त्यांनी तो वसईकरांना देण्याचा प्रयत्न जरूर केला,

Adv ✅
या कार्यकाळात त्यांनी जमेल तितका वाद मिटवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला हे देखील विसरता कामां नये, त्यामुळे काही अंशी वसईचा सहकाराचा गाढा त्यांनी बऱ्यापैकी हाकला यात अजिबात शंका नाही,
दरम्यान उपनिबंधक सहकारी संस्था गट- अ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचे राज्य शासनाचे उपसचिव नितीन गायकवाड यांनी दि. 29 एप्रिल 2026 रोजी आदेश काढले,
त्यानुसार वसई तालुका सहकारी संस्थांचे तालुका उपनिबंधक अमर शिंदे यांना ठाणे शहर उपनिबंधक म्हणून नियुक्त केले आहे,
मात्र वसई तालुका उपनिबंधक म्हणून आता कोणाची वर्णी लागणार हे मात्र काही दिवस गुलदस्त्यात राहणार असलं तरी त्यासाठी वसईकरांना काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
हा वाचा…शासन आदेश ✅

✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा Mymarathi7.com
![]()
