राज्यांतील दुसऱ्या टप्प्यातील राज्य पोलीस सेवेतील (मा पो से ) मधील ४४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी..

पोलीस आस्थापना मंडळ क्रं.१ यांच्या शिफारशीचा यथायोग्य विचार करून आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम (सन १९५१ चा २२ ) याच्या कलम २२ न मधील तरतुदी नुसार, पुढील तक्तयातील स्तंभ (२) मधील भारतीय पोलीस /राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची, स्तंभ (३) मध्ये नमूद त्यांच्या विद्यमान पदावरून, स्तंभ (४) मध्ये निर्दीष्ठ पदावर, याद्वारे, बदलीने पदस्थापना करण्यात आल्याचे आदेश शासनाचे सह सचिव सुग्रीव धपाटे यांनी काढले आहेत.
वसई :- आशिष राणे, वसई
महाराष्ट्र शासन गृह विभागाने राज्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत महत्वाचे शासन आदेश जारी केले आहेत. १५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात आय.पी.एस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या केल्या आता दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र पोलीस सेवेतील ४४ पोलीस अधिकाऱ्यांच्या विविध जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस आस्थापना मंडळ क्रं.१ यांच्या शिफारशीचा यथायोग्य विचार करून आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम (सन १९५१ चा २२ ) याच्या कलम २२ न मधील तरतुदी नुसार, पुढील तक्तयातील स्तंभ (२) मधील भारतीय पोलीस /राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची, स्तंभ (३) मध्ये नमूद त्यांच्या विद्यमान पदावरून, स्तंभ (४) मध्ये निर्दीष्ठ पदावर, याद्वारे, बदलीने पदस्थापना करण्यात आल्याचे आदेश शासनाचे सह सचिव सुग्रीव धपाटे यांनी काढले आहेत.
Adv✅
यामध्ये विशेष म्हणजे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालंय अंतर्गत परिमंडळ २ व ३ म्हणजेचं वसई आणि विरार पोलीस उपायुक्त या दोघांच्या ही बदलीचा समावेश आहे, वसई परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले (श्रींगी) यांची बदली पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे, तर विरार परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांची बदली सहायक पोलीस महानिरीक्षक, दक्षता या पदावर करण्यात आली आहे,

Adv ✅
या दोघाचे ही मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस सेवा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शासनाने त्यांच्या नियमित बदल्या म्हणून या दोघा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अन्य जिल्ह्यात बदलीने पदस्थापना दिली आहे.

Adv✅
वसई आणि विरार मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून प्रिती टिपरे की विक्रम देशमुख,विरकर की अन्य दुसरे कोणी ?
दरम्यान या बदलीने रिक्त झालेल्या या महत्वाच्या वसई व विरार परिमंडळं २ व ३ यांच्या जागी अदयाप कोणीही पदभार स्वीकारलेला नसल्याचे समजते,
पोलीस उपायुक्त प्रिती टिपरे की विक्रम देशमुख, विरकर की अन्य कोणी ?
परिणामी या बदल्याच्या आदेशानुसार यातील तक्तयाचे अवलोकन केले असता नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात डायल ११२ या पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी प्रिती टिपरे यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस उपायुक्त पदावर बदली केली आहे तर पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, पुणे येथील विक्रम देशमुख यांची देखील,मीरा भाईंदर वसई विरार पोलीस उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे त्यामुळे आता वसई आणि विरार पोलीस उपायुक्त म्हणून कुणाची वर्णी लागणार हें लवकरच कळेल..
या संदर्भात मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्गाशी संपर्क केला असता तो झाला नाही मात्र #mbvv जनसंपर्क अधिकारी यांना विचारले असता अजुन नवी नियुक्ती झाली नसल्याचे त्यांनी सांगितले तर वसई व विरार पोलीस उपायुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार परिमंडळ -१ च्या पोलीस अधिकारी यांच्याकडे असल्याचे खास सूत्राकडून समजलं आहे मात्र लवकरच या दोन्ही ही रिक्त पदावर नवे पोलीस अधिकारी नियुक्त होतील असा विश्वास ही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने व्यक्त केला आहे.
काय आहेत शासन आदेश.हें वाचा …. ✅

✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !
Mymarathi7.com✅
![]()
