दिल्लीत महाराष्ट्राचा डंका : महाराष्ट्रातील ५ खासदारांची ‘संसद रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

यामध्ये भाजपा परिवारातील खा. डॉ. हेमंत विष्णू सवरा, खा.मेधाताई कुलकर्णी आणि खा. स्मिताताई वाघ यांच्या सोबतच भाजपा महायुतीतील शिवसेनेचे खा.डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि खा.नरेश म्हस्के यांचा समावेश आहे.
वसई :- आशिष राणे
दिल्ली स्थित पवित्र संसदेतील उत्कृष्ट व प्रभावी कामगिरीबद्दल दिला जाणारा देशातील प्रतिष्ठित असा “संसद रत्न पुरस्कार २०२६” यंदा पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांना जाहीर झाला आहे.

Adv ✅
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील केवळ ५ खासदारांना हा मानाचा पुरस्कार मिळाला असून, त्यामध्ये डॉ. सवरा यांचा समावेश झाल्याने पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Adv ✅
२०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत संसदेतील उत्कृष्ट उपस्थिती, प्रभावी मांडणी, जनहिताचे प्रश्न आणि संसदीय कामगिरीच्या आधारे संसद रत्न पुरस्कार समितीने ही निवड जाहीर केली आहे.
Adv ✅
पालघरच्या जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडत विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या कार्याची ही राष्ट्रीय स्तरावरील दखल मानली जात आहे.
संग्रहित ✅(डॉ. हेमंत सवरा संसदेत प्रश्न मांडताना )☝️
यंदाचा १६ वा “संसद रत्न पुरस्कार” सोहळा जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे पार पडणार असून, देशभरातील निवडक खासदारांमध्ये पालघरच्या खासदारांचा गौरव होणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याची माहिती खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.
✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !
Mymarathi7.com
![]()
