सहकारी संस्था,पालघर जिल्हा उपनिबंधक पदी किशन रत्नाळे यांची वर्णी 

 

पालघर जिल्हा उपनिबंधक यांची बदली तर…झाली मात्र अदयाप पदस्थापना नाही ?

सहकारी संस्था, पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांनी दि.10 मार्च 2023 रोजी पालघर जिल्ह्याचा पदभार स्विकराला होता, त्यांचा आजवर 37 महिन्यांचा सेवा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राज्य शासनाने त्यांची बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी बदली आदेश जारी केले, मात्र बदलीनंतर शासनाने त्यांना नवीन पदस्थापना दिलेली नाही, किंबहुना त्यांच्या बदलीनंतरचे स्वतंत्र आदेश काढले जातील असे ही आदेशात म्हंटलं आहे.

वसई : आशिष राणे

सहकारात अग्रेसर तथा आदिवासी बहुल अशा पालघर जिल्ह्यातील सहकारी संस्थाचा कारभार मागील तीन वर्षांपासून व्यवस्थित रित्या सांभाळणारे पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांची अखेर राज्य शासनाने बदली केली आहे.

त्यांच्या जागी सहकारी संस्था, ठाणे तालुका उपनिबंधक किशन रत्नाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Adv

सहकारी संस्था, पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांनी दि.10 मार्च 2023 रोजी पालघर जिल्ह्याचा पदभार स्विकराला होता, त्यांचा आजवर 37 महिन्यांचा सेवा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राज्य शासनाने त्यांची बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी बदली आदेश जारी केले, मात्र बदलीनंतर शासनाने त्यांना नवीन पदस्थापना दिलेली नाही, किंबहुना त्यांच्या बदलीनंतरचे स्वतंत्र आदेश काढले जातील असे ही आदेशात म्हंटलं आहे.

दरम्यान नवनियुक्त ठाणे तालुका सहकारी संस्थांचे उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी विनाविलंब गुरुवार दि. 30 एप्रिल रोजी सायंकाळी सहकारी संस्था पालघर जिल्हा उपनिबंधक म्हणून त्यांच्या कार्यालयाचा पदभार मावळते जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांचेकडून स्विकराला,असून पालघर जिल्ह्यातील सहकार विभागाच्या कामकाजाला त्यांनी सुरुवात केल्याचे नवनियुक्त जिल्हा उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी सांगितले,

दरम्यान उपनिबंधक सहकारी संस्था गट -अ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचे लेखी आदेश शासनाचे उपसचिव नितीन गायकवाड यांनी दि.29 एप्रिल 2026 रोजी काढले,

Adv

त्यानुसार या नियमित बदल्या करण्यात आल्या असून जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांना मात्र शासनाने बदली नंतरची पदस्थापना अद्यापही दिलेली नाही तर लवकरच शासनाचे पदस्थापनेचे आदेश येतील असेही मावळते जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

*******************************************

“होय.. शासनाचे बदली आदेश प्राप्त होताच गुरुवारी सायंकाळी पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी सरांकडून पदभार स्वीकारला आहे आणि प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात देखील केली आहे लवकरच जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांच्या कार्यालयाचा आढावा घेतला जाईल..!

किशन रत्नाळे 

नवनियुक्त जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर 

******************************************

विविध वृतपत्रे,प्रसार माध्यमे, जिल्ह्यातील विविध संस्था,आणि खास करून सहकार क्षेत्रातील तज्ञ मंडळी , आणि लोकप्रतिनिधी तथा पालघर वासियांचे खूप सहकार्य लाभले, स्नेह मिळाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद, जय सहकार…

शिरीष कुलकर्णी 

तत्कालीन पालघर जिल्हा उपनिबंधक 

******************************************

हे वाचा शासन बदली आदेश

✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !

Mymarathi7.com

 

 

 

 

 

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!