भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने हे खडतर असे प्रशिक्षण घेण्यात आले असून, ते अत्यंत कठीण व मानसिक-शारीरिक क्षमतेची कस पाहणारे मानले जाते. वसईतील अमित राठोड याची ही यशोगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे…..
नेपाळ /हिमाचल /वसई :- मच्छिंद्र चव्हाण
वसईचं रहिवाशी असलेलं तरुण -तडफदार व्यतिमत्व अमित सिताराम राठोड यांने अक्षरशः माऊंट एव्हरेस्ट म्हणजेच हिमालयातील १५,७०० फूट (४,८०० मीटर) उंचीवरील “शितिधार शिखर” हे सर करत अत्यंत थरारक आणि प्रेरणादायी कामगिरी नुकतीच बजावली आहे.
मागील तीन दिवसापूर्वीच हे शितिधार शिखर अमित यांने सर केलं आहे अर्थात त्यांनी हिमाचल प्रदेश, मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी माउंटेनियरिंग अँड अॅडव्हेंचर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (ABVIMAS) मध्ये बेसिक माउंटेनियरिंग कोर्स (BMC) यशस्वीरित्या पूर्ण केला.
या प्रशिक्षणात हिमालयातील प्रतिकूल परिस्थितीत चढाई, बर्फात चालण्याचे तंत्र, दोर वापर, आपत्कालीन बचाव कार्यप्रणाली यांचे सखोल शिक्षण दिले जाते. अमित यांनी मनाली येथून चढाईला सुरुवात करून सोलांग नाला, त्यानंतर बकरथाच बेस कॅम्प पार करत अखेर पिर पंजाल पर्वतश्रेणीतील शितिधार शिखर यशस्वीरित्या गाठले.
भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने हे प्रशिक्षण घेण्यात आले असून, ते अत्यंत कठीण व मानसिक-शारीरिक क्षमतेची कस पाहणारे मानले जाते. अमित यांची ही यशोगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अमित यांचा पुढील उद्देश कांचनगंगा, माऊंट एव्हरेस्ट यांसारख्या जगातील सर्वोच्च शिखरांवर भारताचा तिरंगा फडकवण्याचा आहे. अमित आता परतीच्या प्रवासाला असून त्याने शिखर सर केल्यानंतरच प्रतिक्रिया दिली होती,त्याच्या या ध्येयासाठी संबंध पालघर जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
“हिमालयातील अनुभवाने मला आत्मविश्वास आणि संयम शिकवलायं. माझं पुढचं स्वप्न सर्वोच्च”माउंट एव्हरेस्ट” सर करण्याचं आहे.” –
अमित सीताराम राठोड ( गिर्यारोहक, वसई )

![]()
