वसई तहसिलदारांची बढतीने झाली बदली : कारभार कसा केला अथवा चालवला याचं अवलोकन… स्वतःच त्या अधिकाऱ्यांनी करावं…??
आपण किती काळ काम केलं यापेक्षा तो कारभार कसा हाताळला व तालुक्यातुन काय घेऊन जाणार याचा विचार किमान उपजिल्हा धिकारी झालेल्या सर्वांनीचं करावा…
किंबहुना वसई तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी वसई तालुक्यात ३० महिने केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावर त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळवल्याची जोरदार चर्चा जरी तालुक्यातील जनमाणसांत रंगणार असली तरी या पदोन्नती त्यांच्या प्रलंबित सेवा जेष्ठता सुचीनुसार व खास करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकां डोळ्या समोर ठेवून झाल्या हेच खरं..आहे
तरी यां सूचित शासनाने त्या त्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील तक्रारी, चौकशी समित्या, एस आय टी… सर्वच बाबी गुंडाळून केल्या याचं दुःख जनतेला राहणार आहे. त्यामुळे तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पदोन्नतीचां कारभार लोकांभिमुख होता कि व्यवसायभिमुख याचं अवलोकन त्यांनीच आरशात उभं राहून स्वतःला विचारलं तर बरं होईल… असो…
वसई : – आशिष राणे.. विशेष वृत्त..
वसई तालुक्याचे कार्यसम्राट तहसीलदार अविनाश कोष्टी यांना नुकतीच उपजिल्हाधिकारी पदी बढती मिळाली आहे.
राज्य सरकारच्या महसूल विभागाने दि. ७ नोव्हेंबर रोजी २०२५-२६ च्या सेवाजेष्ठता सूची नुसार तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या उपजिल्हाधिकारी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांचे हीं नावं पदोन्नती सेवाजेष्ठता सूचीतील अ. क्रं. ६० असून त्यांच्या जेष्ठतेचा क्रमांक.२२२७ असा आहे.
विशेष म्हणजे वसई तहसीलदार अविनाश कोष्टी यांना उपजिल्हाधिकारी म्हणून बढती मिळाली असली तरी मात्र त्यांना अदयाप उपजिल्हाधिकारी म्हणून कुठेहीं नियुक्ती मिळालेली नाही.
दरम्यान, तहसीलदार वसई यांच्या बढती मुळे रिक्त झालेल्या तहसीलदार पदी एक-दोन दिवसांत नियुक्ती करण्यात येणार असल्याची हीं माहिती महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांने दिली आहे.
परिणामी राज्य निवडणूक आयोगाच्या रिक्त जागा भरणे कामी महसूल विभागास स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूक कार्यक्रमासाठी निवडणूक निर्णय अधिकारी पदाची ११२ पदे राज्यात तात्काळ भरावयाची आहेत, त्यानुसार या बदल्या व बढत्या झाल्या आहेत. त्यामुळे नव्याने पदोन्नती झालेल्या सर्वच उपजिल्हाधिकारी यांना निवडणूक आयोग यांच्या अधिपत्याखाली कार्यरत राहावे लागणार अथवा आपला विभाग सोडून अन्य विभागात देखील पदभार स्वीकारावा लागणार आहे.
तत्कालीन तहसीलदार उज्वला भगत यांची हीं उपजिल्हाधिकारी पदी बढती….

दि.१२ एप्रिल २०२३ मध्ये तत्कालीन तहसीलदार उज्वला भगत (बनसोड) यांच्या बदलीनंतर अविनाश कोष्टी यांची वसई तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
वसईतुन बदली होऊन गेलेल्या तहसीलदार उज्वला भगत या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागातच कार्यरत आहेत, त्यामुळे उज्वला भगत आता उपजिल्हाधिकारी ( निवडणूक )म्हणून काम पाहतील अशी माहिती आहे.
किंबहुना वसई तहसीलदार कोष्टी यांनी वसई तालुक्यात ३० महिने केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावर त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळवल्याची जोरदार चर्चा जरी तालुक्यातील जनमाणसांत असली तरी या पदोन्नती त्यांच्या प्रलंबित सेवा जेष्ठता सुचीनुसार व खास करून आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूकां डोळ्या समोर ठेवून आणि राज्य निवडणूक आयोगाकडे राज्यातील विविध विभागातील निवडणूक निर्णय अधिकांऱ्यांची ११२ पदे रिक्त असून या पदोन्नतीने या जागा भरण्याच्या अनुषंगाने झाल्याचे शासनाने काढलेल्या उपसचिव महेश वरुडकर यांच्या लेखी आदेशाने स्पष्ट होतं आहे.
![]()
