सहकारात सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या “एकता पतसंस्थे” च्या बहुमजली मुख्य कार्यालयाचे २४ मे रोजी आगाशीत उद्घाटन ! उद्घाटनासाठी मान्यवरांची मांदियाळी

वसई :-आशिष राणे

वसईच्या सहकार क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या वसई तालुक्यातील शिरलंय आगाशी येथील “एकता पतसंस्थे” च्या बहुमजली मुख्य कार्यालयाचे दि २४ मे रोजी सायं ४ वाजता मोठ्या थाटात उद्घाटन होत असून या उद्घाटनासाठी मान्यवरांची मोठी मांदियाळी उपस्थित राहणार असल्याची माहिती एकता पतसंस्थेचे अध्यक्ष फ्रान्सिस लोपीस यांनी दिली आहे

दरम्यान या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रामुख्याने आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, पालघर जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखर, वसईचे बिशप थॉमस डिसोझा, पालघरचे खासदार डॉ.हेमंत सावरा, वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित ,नालासोपाराचे आमदार राजन नाईक, बसिन कॅथोलिक बँकेचे अध्यक्ष बेनोल्ड डायस तसेच राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी, वसई उपनिबंधक अमर शिंदे, वसई तहसीलदार, पोलीस अधिकारी व समाजातील विविध संस्था, संघटना, बँकांचे पदाधिकारी या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

एकता पतसंस्थेच्या एकुणच सर्व सभासद, भागीदार,हितचिंतक व पंचकोशीतील नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष फ्रान्सिस लोपीस आणि सचिव सुनील डाबरे यांनी केले आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!