“एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत राज्यपालांनी वृक्षारोपण केलं तर राज्यभर जसे कार्यक्रम संपन्न झाले तसे पालघर जिल्ह्यात ही आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्षाच्या निमित्ताने विविध शिबीरे, कार्यशाळा, रक्तदान, वृक्षारोपण, सहकार विभाग, शेती आदी विषयी माहिती सत्र, विविध सहकारी संस्थाच्या माध्यमातून आयोजित केले होते त्यात माहीम स्थित सहकारी संस्था अग्रेसर राहिली अर्थात राज्यपालांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील माहीम सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा राज्यपालांनी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार ही केला ही एकप्रकारे सहकाराच्या पालघर जिल्ह्याला शासनाकडून मिळालेली पोचपावती म्हणावी लागेल !
वसई :- आशिष राणे
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ तसेच केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ७ जुलै २०२५ रोजी मुंबई, राजभवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

विशेष म्हणजे याप्रसंगी पालघर जिल्ह्यातील माहीम सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार देखील करण्यात आला, तर ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सहकार आयुक्त दीपक तावरे, तसेच सहकार विभागातील सहसचिव संतोष पाटील, पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांच्यासह सहकार विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.
![]()
