“महाराष्ट्र पोलिसांच्या “सद्रक्षणाय फलनिग्रहाय” या ब्रिदवाक्यानुसार, आम्ही चांगल्या गोष्टीचे रक्षण करण्यासाठी आणि गुन्हेगारी घटकांना आळा घालण्यासाठी प्रयत्नशील राहू, सोबत मिरा-भाईंदर वसई-विरार मध्ये शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखू आणि ते “एक आनंदी आणि समृद्ध समुदाय बनवू असे ही आवाहन नवीन पोलीस आयुक्त कौशिक यांनी केलयं”
वसई :- आशिष राणे
मिरा – भाईंदर वसई -विरार आयुक्तलयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडये (आयपीएस ) यांची बुधवारी गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी लेखी आदेश काढून बदली केल्यानंतर शासनाने त्यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे केली आहे
त्यांच्या जागेवर नियुक्ती झालेले निकेत कौशिक (आयपीएस ) यांनी आज दि. १० जुलै २०२५ रोजी नवीन पोलीस आयुक्त म्हणून मिरा-भाईंदर वसई -विरार पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्विकारल्याची माहिती आयुक्तलयाचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली
दरम्यान हा पदभार स्विकारते वेळी दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, संदीप डोईफोडे पोलीस उप- आयुक्त (गुन्हे), अशोक विरकर पोलीस उप- आयुक्त (मुख्यालय), प्रकाश गायकवाड पोलीस उप- आयुक्त (परिमंडळ -१), श्रीमती पौर्णिमा चौगुले- श्रींगी पोलीस उप-आयुक्त ( परिमंडळ -२ ), सुहास बावचे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ- ३) व इतर पोलिस अधिकारी व अंमलदार हजर होते.
नागरिकांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यास आम्ही वचनबद्ध !
निकेत कौशिक (आयपीएस ) हे यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे कार्यरत होते. पदभार स्विकारल्यानंतर निकेत कौशिक (आयपीएस ) यांनी प्रतिक्रिया नोंदवताना सांगितलं की,मिरा-भाईंदर वसई विरार या भागातील नागरिक आणि रहिवाशांचे जीवन, स्वातंत्र्य आणि कायदेशीर हितसंबंधांचे रक्षण करण्यास आम्ही वचनबद्ध आहेत.
महाराष्ट्र पोलिसांच्या “सद्रक्षणाय फलनिग्रहाय” या ब्रिदवाक्यानुसार, आम्ही चांगल्या गोष्टीचे रक्षण करण्यासाठी आणि गुन्हेगारी घटकांना आळा घालण्यासाठी प्रयत्नशील राहू, तसेच यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना स्थापित नियम आणि कायदे काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करतो असे सांगताना मला खात्री आहे की,
आमच्या सामूहिक प्रयत्नाद्वारे आम्ही मिरा-भाईंदर वसई-विरार मध्ये शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखू आणि ते “एक आनंदी आणि समृद्ध समुदाय बनवू असे ही प्रतिपादन नवनियुक्त पोलीस आयुक्त कौशिक यांनी केले
![]()
