वसईच्या कार्मेलाईट कॉन्व्हेंट हायस्कूची विद्यार्थीनी रेणुका तोंडेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश : वसई तालुक्यात गुणवत्ता यादीत मिळवलं स्थान

वसई :- आशिष राणे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ईयत्ता 5 वी साठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत वसईची रेणुका रामदास तोंडे या विद्यार्थीनीने वसई तालुक्यातून गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.

रेणुका तोंडे ही कार्मेलाईट कॉन्व्हेंट हायस्कूल सांडोर वसई येथील विद्यार्थिनी आहे. ती अत्यंत हुशार व अभ्यासू विद्यार्थीनी म्हणून तिची हायस्कूल मध्ये ओळख राहिली आहे.

एकूणच या परीक्षेसाठी तिला शिक्षिका सिद्धी अहिरे व माधवी राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून रेणुकाच्या या यशाबद्दल तिची आई सोनाली तोंडे आणि वडील प्रा. डॉ.रामदास तोंडे यांनीही तिचे कौतुक केले आहे,यासोबत कार्मेलाईट कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर एग्नेस व शिक्षक वृंदांनी तिच्या या उत्तम व मार्गदर्शक यशाबद्दल रेणुकाचे मनस्वी अभिनंदन केले आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!