हे फक्त वसईची संघर्षकन्या आमदार फक्त घडवून आणू शकते !
हा तर विद्यार्थ्यांना मिळाला प्रेरणादायी अनुभव !

“विद्यार्थ्यांना संसदीय सैर, नेतृत्व आणि विधानभवन कामकाज प्रत्यक्ष काय असतें हे अनुभवण्यासाठी एक दूरदृष्टी असणे आवश्यक असतें आणि हे फक्त ती संघर्षकन्याच करू शकते हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीत पुन्हा एकदा अधोरेखित झाले, अर्थात मुख्यमंत्री फडवणीस यांनी वेळात वेळ काढून विद्यार्थ्यां मित्रांशी आत्मीय संवाद साधला, त्यांच्या शैक्षणिक जीवनाबाबत जाणून घेतले आणि त्यांना भविष्यातील अभ्यासाच्या प्रेरणा ही दिल्या हे फार थोडे थोडके नाही तर हा अनमोल ठेवा आहे”!
वसई :- आशिष राणे
वसई विधानसभा मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना संसदीय प्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक अनुभवता यावे, यासाठी पावसाळी अधिवेशन २०२५ च्या निमित्ताने एक प्रेरणादायी उपक्रम बुधवार दि. ०७ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता,
याकरीता वसईच्या संघर्षकन्या आम. स्नेहा ताई दुबे पंडित यांनी विशेष पुढाकार घेत इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या ५० विद्यार्थ्यांना विधानभवन भेटीची संधी उपलब्ध करून दिली.
विशेष बाब म्हणजे या भेटीत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घडवून आणण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी आत्मीय संवाद साधला, त्यांच्या शैक्षणिक जीवनाबाबत ही जाणून घेतले आणि अभ्यासाच्या प्रेरणा ही दिल्या.
तदनंतर विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या चालू अधिवेशनातील प्रत्यक्ष कामकाज ही जवळून पाहिले, सभागृहातील प्रक्रिया समजून घेतली आणि संपूर्ण विधानभवन परिसराची सैर करत लोकशाही व्यवस्थेचे महत्त्वाचे शिक्षण ही घेतले.
दरम्यान या प्रेरणादायी उपक्रमात आमदार स्नेहाताई दुबे पंडित, शाळांतील शिक्षक-शिक्षिका,तसेच या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा व पंचायत समिती वसई येथील शिक्षक सखाराम भुमकर, अमोल साळुंखे, होनाजी मेस्त्री, अमृता सावे, रूपा बुरकुल, बिजेंद्र कुमार,अक्षय ठाकूर आदी सहकारी आवर्जून उपस्थित असल्याची महत्वपूर्ण माहिती आम. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या वसई येथील जनसंपर्क कार्यालयाने दिली

“विद्यार्थी व विधान भवन संसदिया सैर त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्रेट भेट या तिहेरी योग तथा या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षण, संसदीय प्रक्रिया आणि नेतृत्व याबद्दल नवे मूल्यबिंदू तयार झाले आहेत “!
आमदार स्नेहा ताई दुबे पंडित
.वसई विधानसभा सदस्या
![]()
