वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

वसई रोड स्थानकांत उन्नत डेक व नवीन पादचारी पूल प्रवाशी वर्गाच्या सेवेत दाखल : MRVC अंतर्गत “स्थानक सुधारणा कामा” मधील महत्त्वाचा टप्पा पूर्ण….

 

वसई रोड स्थानकांतील गर्दी कमी होण्यास मदत…तर उर्वरित कामें ही दिलेल्या वेळेतच होणार..!

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) तर्फे ‘मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-३ ए’(एमयूटीपी-३ ए) अंतर्गत सुरू असलेल्या स्थानक सुधारणा कामांतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असल्याचा आनंद रेल्वे अधिकारी आणि स्थानकांतील प्रवाशी वर्गांनी यावेळी व्यक्त केला.

वसई : -आशिष राणे
पश्चिम रेल्वेचं एक प्रमुख आणि महत्वाच्या वसई रोड
स्थानकांत प्रवाशी वर्गासाठी मागील अनेक वर्षा पासून स्थानकांतील सोयी सुविधांचे काम युद्धपातळीवर सुरु आहें, त्यातच या स्थानकातील प्रवाशी वहनक्षमता वाढविण्यासाठी उभारण्यात आलेला नवा पादचारी पूल म्हणजेच (fob) फूट ओव्हर ब्रिज) आणि उन्नत डेक (Elevated Deck)

गुरुवार दि.१२ फेब्रुवारी पासून प्रवाशी वर्गाच्या सेवेत दाखल झाल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) तर्फे ‘मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-३ ए’ (एमयूटीपी-३ए) अंतर्गत सुरू असलेल्या स्थानक सुधारणा कामांतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असल्याचा आनंद रेल्वे अधिकारी आणि स्थानकांतील प्रवाशी वर्गांनी यावेळी व्यक्त केला.

या वसई रोड स्थानकातील पूर्वेकडील सर्क्युलेटिंग एरिया ते आयलंड प्लॅटफॉर्म क्रं. ४-५ आणि ६-७ यांना जोडणारा ६ मीटर रुंद व ४२ मीटर लांबीचा पादचारी पूल (FOB ) पूर्ण करून तो प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.
या पुलासोबतच पूर्व बाजूस जिन्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामुळे पूर्वेकडून प्लॅटफॉर्मवर पोहोचणे आता अधिक सुलभ झाले आहे.
तसेच नव्या पुलाला जोडणाऱ्या प्रस्तावित २५० मीटर लांबीच्या उन्नत डेकपैकी ५० मीटर लांबीचा आणि १० मीटर रुंद भाग देखील गुरुवार पासून कार्यान्वित करण्यात आला आहे.

यापूर्वी या डेकमधील ६० मीटरचा भाग डिसेंबर २०२५ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत.-

 

वसई रोड स्थानकांतील गर्दी कमी होण्यास
मिळेल मदत—-

याठिकाणी पहाटे पासून ते रात्री पर्यंत दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशी वर्दळ असलेल्या वसई रोड स्थानकात नवा पादचारी पूल व उन्नत डेकमुळे प्रवाशांची ये-जा अधिक जलद होण्यास नक्कीच मदत होणार असून, प्लॅटफॉर्म वरील गर्दी कमी होण्याची मोठी अपेक्षा आहे.

उर्वरित कामें ही निश्चित वेळेतच पूर्ण करणार —MRVC

वसई रोड स्थानकातील उभी व आडवी वहनव्यवस्था सक्षम होण्याबरोबरच सुरक्षिततेतही अधिक भर पडणार आहे.तसेच गर्दीच्या उपनगरी मार्गिकेवर रेल्वे वाहतूक अबाधित ठेवत ही कामे ही करण्यात आली असून, उर्वरित सुविधा निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे नियोजन एमआरव्हीसीकडून करण्यात आल्यामुळे प्रवाशी वर्गाला तूर्तास तरी आनंद मिळतो आहें.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!