विद्येचं व कलावंताचं आपलं महात्मा फुले नगर – संदेशभाऊ जाधव

 

विद्या व कलावंताच्या महात्मा फुले नगरात दिपावलीच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…!

 

वसई :- आशिष राणे
माणिकपूर दिवाणमान रोहिदास ज्ञाती पंचायत महात्मा फुले नगर मध्ये रांगोळी स्पर्धेच आयोजन करण्यात आलं यावेळी घरोघरी ठीपक्यांची ,पान फुल व निसर्ग रांगोळ्या काढण्यात आल्या.

दरम्यान या रांगोळी स्पर्धाचं परिक्षण जुचंद्र गावांतील भरत प्रधान व सागर म्हात्रे या तज्ञ कलाकारांनी केलं यावेळी तीन गटांत प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ अशा प्रकारे सन्मान चिन्ह,रोख व चालीरीती पुस्तक देऊन संत रोहिदास सामाजिक संस्था- अध्यक्ष व माजी सभापती स्थायी समिती संदेशभाऊ जाधव यांचे हस्ते सन्मानित करण्यात आलं,

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिदास ज्ञाती पंचायतीचे अध्यक्ष चंद्रकांत वनमाळी यांनी केले,
यावेळी संदेशभाऊ जाधव यांनी महात्मा फुले नगर विद्येचा व कलावंतांचा गांव असुन सर्वश्री तुळशीदास वनमाळी,सुधीर वनमाळी,अजित राऊत,राजेंद्र वनमाळी,सचिन जाधव यांचा नामवंत आर्टिस्ट असल्याचा आवर्जून उल्लेख केला,

दरवर्षी महात्मा फुले नगर मधील दिवाळीची सुरूवात घरोघरी रांगोळी,आकाशकंदील,खमंग फराळाचा स्वाद , फटाक्याची आतषबाजी आणि दिव्यांचा प्रकाश याचा उल्लेख करत शुभ दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी ज्ञात पंचायतीचे वैभव वनमाळी,शशिकांत भोईर , राकेश जाधव ,पार्थ भोईर ,सिद्धेश जाधव आदी उपस्थित होते,

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुर्यकांत सातवे यांनी केलं तर शेवटी  आभार  शामकांत जाधव यांनी मानले.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!