सत्कार आपल्याला जनमाणसांत भरीव कार्य करण्यासाठी स्फूर्ती देतात : उत्तम कुमार, यांनी मानले मनःपूर्वक आभार..!
“मल्याळी समाज हा नाशिकच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांच्या संस्कृतीत अनुशासन, शिक्षण आणि समाजसेवेचा संगम दिसतो. अशा संस्थांनी एकत्र येऊन समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य केले पाहिजे.”(आमदार सीमा ताई हिरे यांचं भावनिक वक्तव्य )
नाशिक :- विशेष बातमीदार
नाशिक मल्याळी कल्चरल असोसिएशनच्या माध्यमातून ११ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक येथील श्री तेज गार्डन बँक्वेट येथे एक भव्य सांस्कृतिक व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्टचे संयोजक उत्तम कुमार यांचा विशेष हृदय सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नाशिकच्या आमदार सिमा हिरे, केरळ सरकारचे अतिरिक्त सचिव अजित के. तसेच भाजपा नाशिक शहर जिल्हाध्यक्ष सुनिल केदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

आमदार सिमा हिरे म्हणाल्या, “मल्याळी समाज हा नाशिकच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांच्या संस्कृतीत अनुशासन, शिक्षण आणि समाजसेवेचा संगम दिसतो. अशा संस्थांनी एकत्र येऊन समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य केले पाहिजे.”
भाजप केरळ प्रकोष्टचे संयोजक उत्तम कुमार यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले, “भाजपचा उद्देश समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सहभागी करणे आहे. महाराष्ट्रातील मल्याळी बांधवांचा सहभाग पाहून मला अत्यंत आनंद वाटतो.”
संस्थेचे अध्यक्ष गोगुलम गोपाळकृष्ण पिल्ले यांनी सांगितले, “नाशिक मल्याळी कल्चरल असोसिएशनचे उद्दिष्ट केवळ सांस्कृतिक उपक्रमांपुरते मर्यादित नसून समाजातील सर्व घटकांमध्ये सलोखा, ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी वाढविणे हे आहे. भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविण्याचे आमचे नियोजन आहे.”
या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक मल्याळी कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष गोगुलम गोपाळकृष्ण पिल्ले, महासचिव अनुप पी व संपूर्ण टीमने एकत्रितपणे केले होते.
मल्याळी समाजातील एकतेचा व सांस्कृतिक समृद्धीचा संदेश देणारा हा सोहळा आनंद, उत्साह आणि प्रेरणेने साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य, संगीत, सांस्कृतिक सादरीकरणे आणि पारंपरिक केरळी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.
![]()
