वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

पालघर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन (‘PDBA’) तर्फे अंडर 18 वर्षेच्या मुलं व मुली यांच्यासाठी आज दि. 27 जुलै रोजी सायंकाळी होणार निवड चाचणी

 

PDBA तर्फे निवडलेले संघ दि.9 ऑगस्ट 2025 ते दि.14 ऑगस्ट 2025 दरम्यान पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अंडर 18 ओपन बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

वसई :- आशिष राणे
पालघर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन (‘PDBA’) तर्फे अंडर 18 वर्षेच्या मुलं व मुली यांच्यासाठी आज दि. 27 जुलै रोजी सायंकाळी निवड चाचणी वसई पूर्वेला मधुबन कॉम्प्लेक्स मधील बास्केटबॉल कोर्ट, एव्हरशाईन गेटसमोर, वसई (पूर्व) येथे आयोजित करण्यात आली आहे.
पालघर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन (‘PDBA’) तर्फे सहभागी होणाऱ्या मुलींसाठी निवड चाचणी दुपारी 4:00 वाजता आणि मुलांसाठी सायंकाळी 5:30 वाजता सुरु होईल. तसेच असोसिएशन मार्फत वयाच्या बद्दल ही स्पष्ट करण्यात आलं आहे.(ज्यांचा जन्म 1 जानेवारी 2007 किंवा त्यानंतरचा आहे)

दरम्यान यात निवडलेले संघ दि.9 ऑगस्ट 2025 ते दि.14 ऑगस्ट 2025 दरम्यान पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अंडर 18 ओपन बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
तर या निवड चाचणीसाठी पात्र ठरण्यासाठी इच्छुकांनी मूळ स्वरूपातील योग्य कागदपत्रे (उदाहरणार्थ – पालघर जिल्ह्यातील वास्तव्यासाठीचा पुरावा, शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र किंवा नोकरीसंबंधी पुरावा) सोबत आणणे आवश्यक आहे.
तसेच निवड झालेल्या खेळाडूंना PDBA तर्फे मोफत तयारी शिबिर (preparatory camp) अटळपणे पूर्णपणे उपस्थित राहून पूर्ण करणे बंधनकारक आहे. नियमितपणे शिबिरात सहभागी होण्याची तयारी असलेल्या उमेदवारांनाच निवड चाचणीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
अधिक माहितीसाठी किंवा कागदपत्रांसंबंधी शंका असल्यास अमरेश – +91 9960908971 यांच्याशी संपर्क साधावा असे ही असोसिएशनचे विश्वनाथन सर यांनी स्पष्ट केलं आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!