“ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे डोकं लावलंय त्यांच्यावर चौकशी समिती गठीत करून दोषीनां निलंबित करा….”
वसई विरार शहर महापालिकेत मागील ५ वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे हम करे सो कायदा असे वागणारे अधिकारी कुणालाही विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने कामे करूननियोजन शून्य कामासाठी केवळ पैशांची उधळपट्टी करीत असल्याचा हा निंदक प्रकार उघडकीस आला आहे.
वसई :- विशेष प्रतिनिधी
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नियोजनशून्य आणि असंवेदनशील कारभाराचे आणखी एक लज्जास्पद उदाहरण समोर आले आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने चक्क वसईतील एका हिंदू स्मशानभूमीतच नागरिकांना व मुलांना खेळण्याचे आणि व्यायामाचे साहित्य बसवले आहे.
हिंदू धर्मीय यांची स्मशानभूमी ही दु:खाची म्हणजे वैकुंठवासाला जाणारी एक अशी जागा मानली जाते. अशा ठिकाणी नागरिकांना व लहान मुलांना मनोरजनांची साधने लावून पालिकेने नागरिकांच्या भावनांशी अक्षरशः खेळ केल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
वसई विरार महापालिकेत मागील ५ वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ व त्यात कनिष्ठ अधिकारी ही कुणालाही विश्वासात न घेता अगदी परस्पर मनमानी पध्दतीने कामे करत असतात. त्यात कसल्याच प्रकारचे नियोजन नसल्याने केवळ पैशांची उधळपट्टी होत असते. पंरतु पालिकेने यावेळी केलेल्या एका कामामुळे वसईतील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.

वसई पश्चिमेच्या प्रभाग समिती ‘आय’ (वसई गाव) अंतर्गत असलेल्या रानगाव रोड येथे बेणापट्टी भागात एक हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. पालिकेने या स्मशानभूमीची दुरावस्था दूर करण्याऐवजी चक्क या स्मशानातच खेळण्याचे आणि मनोरंजनाचे साहित्य लावले आहे. या जागेत वेगवेगळ्या प्रकारची १५ हून अधिक साहित्य लावण्यात आली आहेत. त्यात झोपाळा, घसरगुंडी आदी साहित्यांचा समावेश आहे. यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे.इथे जवळच खेळाचे मैदान आहे. मात्र तरीही पालिकेने खेळाचे आणि व्यायामाचे साहित्य स्मशानभूमीत आणून बसविले आहे.स्मशानभूमी परिसरात लहान मुले आणि महिला येत नाहीत याचेही भान पालिकेला नाही, असे स्थानिकांनी म्हटले आहे. खरंतर हे येथे राहणाऱ्या हिंदू धर्मीय लोकांचे स्म्शान आहे इथं या स्मशानात नित्याने अंत्यविधी होत असतात लहान मुले अशा वातावरणात इथे कशी खेळणार असा संतप्त सवालही स्थानिकांनी केला आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या उपायुक्ता (उद्यान) स्वाती देशपांडे यांना या गंभीर बाबी विषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की,हा सर्व प्रकार चुकीचा असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. तर या संपूर्ण प्रकऱणाची माहिती घेऊन कारवाई केली जाईल तसेच स्मशानभूमीत लावलेले साहित्य काढण्यात येतील असे ही त्यांनी सांगितले.
हा बघा तो व्हिडीओ बेणापट्टी हिंदू स्म्शानभूमीत नागरिकांसाठी व लहान मुलासाठी उभी केलेली साहित्य व खेळणी…
पालिका कुणाला जबाबदार धरणार की स्वतः च दोषी?
आता पाहू या स्मशानभूमीच्या जागेतील खेळणी व अन्य व्यायामाचे साहित्य कधी काढले जाते ? मात्र हे काम कोणी केले व हे काम कुठल्या जागेवर होते आहे याची पालिका उद्यान विभागातील अधिकारी वर्गांनी कोणती चौकशी व स्थळ पाहणी केली हा विषय मात्र आता संशोधनाचा झाला आहे,त्यात साहित्य काढून लाखोंचं नुकसान होणार मग याची भरपाई कोणाकडून वसुल केली जाणार असे अनेक प्रश्न आता पालिकेच्या पटलावर आले आहेत.त्यात प्रत्यक्षात सखोल चौकशी होऊन दोषीना निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे.
![]()
