सेवा, संवेदनशीलता आणि समर्पण एक उत्तरदायित्वाची भावना मनामध्ये ठेवत मुख्यमंत्री फडवणीस यांच्या आवाहनाला वसईच्या संघर्षकन्या आमदार स्नेहाताईंनी खारीचा वाटा उचलत खऱ्या अर्थी साद घातली आहे. हे कार्य थोडं थोडके नसून एक सामाजिक जाणीवेच भान राखण्याचं लक्षण व आपले समाजाप्रती असलेलं दायित्व असल्याचं अधोरेखित होते आहे
मुंबई /वसई :- आशिष राणे
सेवा, संवेदनशीलता आणि समर्पण एक उत्तरदायित्वाची भावना मनामध्ये ठेवत यंदाही आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने व सामाजिक संवेदनशीलतेने साजरा केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यानी मला शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ न देता गरजू लोकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये आपले योगदान द्या असे भावनिक आवाहन मागील आठवड्यात केले होते.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावनिक आवाहनास वसईच्या संघर्षकन्या आम. स्नेहाताई दुबे पंडित यांनी साद घातली आणि लागलीच दि. २५ जुलै २०२५ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सोबत त्यांना भेटवस्तू म्हणून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी २ लाख ५५ हजार रुपये देणगीचा धनादेश सुपूर्द केला ही भेट स्विकारल्यावर आनंद व समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसईच्या संघर्षकन्येचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

याप्रसंगी बोलताना आम. स्नेहाताई म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मागील आठवड्यात आवाहन केलं होतं आणि त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आपला खारीचा वाटा म्हणून एक छोटासा धनादेश सुपूर्द करताना आज मला अत्यंत समाधान वाटले असल्याचं त्यांनी म्हंटल आहे
![]()
