नाताळच्या आगमन काळास प्रारंभ….
वसई धर्मप्रांतातील सांडोरच्या सेंट थॉमस चर्च मध्ये नाताळपूर्व पहिली मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली असून नाताळच्या आगमन काळास यंदा डिसेंबर पूर्वीच ३० नोव्हेंबर रोजीच प्रारंभ झाला आणि पहिली जांभळी मेणबत्ती विधिवत प्रज्वलीत केली आहें सोबत वसईत चर्चेस बाहेरील रस्त्यावर आता यनिमित्ताने सजावटीची दुकाने आणि गोठा सजवण्यासाठी तयारी देखील सुरू झाली आहें.

वसई :- आशिष राणे
सालाबादप्रमाणे नाताळच्या ख्रिस्त आगमनाच्या काळास यंदा दि.३० नोव्हेंबरच्या पहिल्या रविवार पासून प्रारंभ झाला आहे.
विशेष म्हणजे वसई धर्मप्रांतातील सांडोर येथील सेंट थॉमस चर्च मध्ये रविवारी नाताळपूर्व पहिली मेणबत्ती फा.अँड्र्यू रॉड्रिग्ज आणि फा.ज्योयल कोरिया यांनी विधिवत प्रज्वलीत केल्यावर आगमन काळातील पहिली मेणबत्ती म्हणजेच जांभळ्या रंगाच्या मेणबत्तींचे वसईतील सर्व चर्चेस मध्ये विधिवत प्रज्वलन करण्यात आले,
त्यानुसार आता यंदाच्या नाताळ आगमनास रविवारी खऱ्याअर्थी सुरुवात झाल्याची माहिती फा.रेमंड यांनी दिली.
तसेच हीं मेणबत्ती प्रज्वलीत झाल्यावर यावेळी सामूहिक मिस्सादेखील करण्यात आला यासोबतच सर्व चर्चच्या बाहेरसजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची दुकाने थाटू लागली आहेत तर यनिमित्ताने नाताळच्या आगमनाची जणू चाहूलच लागल्याचे प्रसन्न चित्र आता वसईतील विविध चर्चच्या बाहेरील रस्त्यावर दिसू लागलं आहे.

आगमन काळात चर्चची उपासना म्हणजे धार्मिक वर्ष आगमन काळाच्या पहिल्या रविवारी सुरू होते. दि.२५ डिसेंबर पूर्वी येणारे चार रविवार हे आगमन काळातील पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा रविवार अशा नावाने ओळखले जातात.
यंदा मात्र दि.२५ डिसेंबरला होणाऱ्या नाताळ सणाच्या आधी यावेळी दि. ३० नोव्हेंबर अखेरीस पहिली मेणबत्ती लागल्यामुळे (आता उर्वरित ७ डिसेंबर, १४, आणि २१ डिसेंबर ) अशा पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा पवित्र संदेश ख्रिस्त मंदिरांतून सर्वदूर दिला जातो.
त्यानंतर दि.२४ डिसेंबरच्या मध्यरात्री येशूजन्माच्या वेळी पांढऱ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून अवघ्या जगभर ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला जातो.
यंदा दि.३० नोव्हेंबरच्या अखेरच्या दिवशी पहिल्या मेणबत्ती आगमन काळाला सुरुवात झाली. त्यानिमित्ताने वसईच्या विविध चर्चमध्ये जांभळी मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली.
पहिला जांभळा रंग जणू आशेचा रंग !
ख्रिस्ती श्रद्धेनुसार जांभळा रंग हा आशेचा रंग आहे. प्रभू येशूख्रिस्त मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर येत आहे, ही आशा या मेणबत्तीच्या प्रज्वलनाने जागवली जाते. येशूजन्माच्या सातशे वर्षे आधी यशया या संदेष्ट्याने येशूच्या जन्माचे भाकीत करून तत्कालीन लोकांना पापमुक्ती आणि तारणाची आशा दिली होती. त्याचेही प्रतीक म्हणून जांभळ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित केली जाते.
कांय आहें या मेणबत्तीचे महत्त्व….!
मेणबत्ती स्वत: जळून इतरांना प्रकाश देते, तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यातून बोध घेऊन इतरांसाठी जगण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. ही मेणबत्ती म्हणजे प्रभू येशूचा प्रकाश, नकारात्मक विचारांनी व्यापलेल्या भवतालात सकारात्मक प्रकाशाची दिशा आहे, असेही आगमन काळातील मेणबत्तीचे महत्त्व आहे.

☝️आगमन काळातील पहिला रविवार सेंट थॉमस चर्च, सांडोर येथे फादर अँड्र्यू रॉड्रिग्ज आणि फादर ज्योयल कोरिया यांच्या हस्ते आगमन काळातील पहिली मेणबत्ती विधिवत प्रज्वलीत करताना छायाचित्रात दिसत आहेत.✅
काय आहे चार रविवारांची आख्यायिका…
पवित्र नाताळ सण हा दि.२५ डिसेंबरला सर्वत्र जगभर साजरा केला जातो हे सर्वश्रुत असताना मग आताच या नाताळचे स्वागत का असा प्रश्न सामान्यांना पडत असतो,परंतु हि एक नाताळ संबधी चार रविवारची आख्यायिका आहे,

✅ पहिल्या रविवारी चर्च मध्ये एक चक्र लावण्यात येते,ते हिरव्यागार पानांनी,डहाळ्यांनी सुशोभित केले जाते आणि हिरवा रंग हा शाश्वताचा प्रतिक आहे.
त्याचसोबत पहिल्या रविवारी संदेशाची मेणबत्ती सुद्धा लावली जाते.कारण या दिवशी पहिले वाचन संदेशाच्या ग्रंथातून घेतलेले असते आणि ते आशेचे प्रतिक आहे.
✅दुसऱ्या रविवारी बेथलेहेम ची मेणबत्ती लावली जाते ती नाताळ गुहेची आठवण करून देते,ती प्रीतीचे प्रतिक आहे,
✅तिसऱ्या रविवारी मेंढपाळाची मेणबत्ती लावली जाते ती आनंदाची प्रतिक असून ती गुलाबी रंगाची असते .आणि @चौथ्या म्हणजे शेवटच्या रविवारी देवदूताची मेणबत्ती लावली जाते आणि ती शांतीचे प्रतिक आहे,
✅आणि खास करून नाताळच्या पूर्वसंध्येला सफेद मेणबत्ती लावली जाते आणि ती मेणबत्ती या पवित्र सणाच्या बाळयेशूचे प्रतिक आहे,अशी हि आगमन काळ विधी ची आख्यायिका असल्याची माहिती धर्मगुरू फा.रेमंड यांनी बोलताना दिली.. .
![]()
