Enforcement Directorate :- part -2 ही.. तर संघटित गुन्हेगारी : ऐतिहासिक वसईला प्रोफेशनल ( PROFESSIONAL ) मंडळींनीच लुबाडले : लपवलेले सर्व काहीं Ed ने गोठवले

 

वसई विरार व मुंबईतील निवडक आर्किटेक्ट, सनदी लेखापाल, एजंट,विकासक,आदींनी महापालिका नगररचना माध्यमातून वसईकरांना कोट्यवधीं रुपयांना लुबाडले असल्याचं आतापर्यंतच्या तपासातून समोर आल्यावर ED ने मागील महिन्यापासून वसई विरार मुंबई, हैदराबाद ,आदी ठिकाणी धाडी, छापे टाकत कोट्यवधींच्या (मुदत ठेवी,म्युच्युअल फंड,बॉण्ड,शेअर्स, सोने, चांदी हिरेजडित रत्न, दस्त ऐवज ) करोडो रुपये हस्तगत करत सर्व खाती मालमत्ता मोठ्या प्रमाणावर गोठवली आहेत

Ed पार्ट -2 च्या कारवाईत ईडीने सपशेल 12 कोटी 71 लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार गोठवले आहेत यामध्ये आतापर्यंत 26 लाखांची रोख रक्कम व काही अत्यंत महत्त्वाचे दस्ताएवज जप्त केले

एकंदरीत वसई विरार व मुंबई उपनगरात कार्यालय व घरे घेऊन वसई विरार महापालिकेत नगररचना विभागात काही निवडक (आर्किटेक्ट )वास्तुविशारद, ( CA) सनदी लेखापाल, लायझनर्स आणि बांधकाम व्यावसायिकांचे रॅकेट कार्यरत आहे हे या कारवाईमुळे अधिरेखीत झाले आहे सोबत हे फार भयानक असून हा तर संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचं स्पष्ट झाले आहे

मुंबई/वसई-विरार : विशेष प्रतिनिधी

अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळी (1 जुलै) वसई-विरार शहरातील वास्तुविशारद, सनदी लेखापाल, लायझनर्स आणि बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी केलेल्या कारवाईत बँकांतील 12 कोटी 71 लाख रुपयांची रक्कम (बचत खाते, मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंड) गोठवली आहेत. तर 26 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

नालासोपारा-आचोळे येथील 41 अनधिकृत इमारत प्रकरणांत वसई-विरार महापालिका नगररचना विभागाचे निलंबित संचालक वाय. एस. रेड्डी यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीतून अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वसई-विरार शहरातील वास्तुविशारद, सनदी लेखापाल, लायझनर्स आणि बांधकाम व्यावसायिक अशा 16 ठिकाणी कारवाई केली होती.

नालासोपारा पूर्व-आचोळे येथील क्षेपणभूमी व सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राच्या आरक्षित जागेवर 41 अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर वसई-विरार महापालिकेने या इमारती निष्कासित केल्या होत्या. या प्रकरणात शेकडो कुटुंब बेघर झाल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ईडीकडे झालेली होती. त्यानुसार मार्च महिन्यापासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत होती.

दरम्यान; अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने 14 मे व 15 मे 2025 रोजी नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या हैदराबादमधील वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधमोहिमेत 8.6 कोटी रोख रक्कम आणि 23.5 कोटी किमतीचे हिरेजडित दागिने आणि बुलियन जप्त केलेले होते. याबाबतचे वृत्त समाजमाध्यमे, सोशल मीडिया, विविध दूरदर्शन वाहिन्या आणि वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झालेली होती. सदरचे कृत्य महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 च्या नियम 3चा भंग करणारे असल्याने आयुक्त अनिलकुमार पवार यांनी वाय. एस. रेड्डी यांना सेवेतून निलंबित केले होते.

वाय. एस. रेड्डी यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीतून अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वसई-विरार शहरातील वास्तुविशारद आणि बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी

दि 1 जुलै रोजी सकाळी कारवाई केली. तब्बल 16 ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. या कारवाईत बँकांतील 12 कोटी 71 लाख रुपयांची रक्कम (बचत खाते, मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंड) गोठविण्यात आली आहे. तर 26 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

दरम्यान; या बांधकाम प्रकरणात पालिका अधिकारी, बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांचे संगनमत असल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. कारवाईदरम्यान अनेक लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय; गोपनीय कागदपत्रे, मालमत्तांचे दस्तावेज, पावत्या, करारनामे तसेच ध्वनिफीत इत्यादी महत्त्वाचा दस्तावेज ईडीच्या हाती लागलेला आहे.शहरातील इमारतींना बांधकाम परवानगी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचे यातून उघड झाले आहे. बांधकाम घोटाळ्यातील काळा पैसा पालिकेत वळवला जात होता, असे निरीक्षण ईडीने नोंदवले असल्याचे ईडी ने माध्यमांसाठी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटलं आहे याउलट यापुढे ही या चौकशी व कारवाई सुरूच राहणार आहेत असे ही शेवटी म्हंटलं आहे

 

ईडी ने जारी केलेल्या प्रेसनोट मध्ये नेमकं काय म्हंटलंय ते जरूर वाचा !😢

 

***

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!