वसईच्या विकासासाठी त्या “संघर्षकन्येचा” मुख्यमंत्र्यांसोबत मुक्त – सकारात्मक संवाद !

वसई :- आशिष राणे

वसई विधानसभा मतदारसंघाच्या आम.स्नेहा दुबे-पंडित यांच्याकडून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पाणी, वीज, रस्ते, दळणवळण आणि पायाभूत सुविधांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत उत्तम संवाद साधून वसईच्या विकासाला चालना व गती देणारी महत्त्वाची अशी निवेदने सादर केली आहेत.

या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मुद्द्यांवर त्या संघर्षकन्येला सकारात्मक प्रतिसाद तथा आग्रही शेरा देत मंत्रालयातील त्या त्या संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीचे आदेश ही दिले असल्याची माहिती आम स्नेहाताई दुबे पंडित यांनी दिली आहे.

दरम्यान अधिक माहितीनुसार ,दि ३० जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सत्र सुरू आहे त्यात प्रामुख्याने वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी वसईतील मूलभूत प्रश्न पाहता वाढती लोकसंख्या व वाढते नागरिकरण पाहता अपुरा पडणारा पाणी पुरवठा, धरण क्षेत्र भागात वारंवार खंडित होणारी वीज, नागरी शहरी व ग्रामीण भागात सातत्याने निर्माण होणारी वीज समस्या, तसेंच अन्य रस्ते, दळणवळण व पायाभूत सुविधांचा अभाव याबाबत अधिवेशनात परखड व स्पष्टपणे प्रश्नोत्तरे च्या तासाला प्रश्न वजा सभागृहाला निवेदन सादर केले होते

या संदर्भात बुधवार दि. ०२ जुलै २०२५ रोजी वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वसई तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर निवेदन सादर केले

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा व संवाद पूर्ण झाल्यावर या सर्व मुद्द्यांवर त्यांनी सकारात्मक शेरा देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले आहेत त्यामुळे वसईकरांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

वडील विवेकभाऊ लढवय्या तर त्यांच्या पाठोपाठ आम स्नेहाताई ही वसईची संघर्षकन्या !
एकुणच आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या वसईत भाजपचे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहिले होते आणि त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरुवातीला आदिवासी विकास आढावा समिती चे अध्यक्ष ( मंत्री दर्जा ) तथा माजी आमदार व श्रमजीवी संघटना संस्थापक अध्यक्ष विवेक भाऊ पंडित यांच्या तालमीत अगदी लहानपणापासूनच तयार झालेले हे लढवय्या नेतृत्व आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांना केवळ आमदार स्नेहाताई नव्हे तर त्यांना जाहीर सभेत वसईची संघर्षकन्या म्हणून संबोधले होते. त्यातच वसईतील मागील २० वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी या संघर्षकन्येच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची कामे होण्यासाठी शासनाच्या सर्व विभागाना स्पष्ट सूचना व निर्देश ही देण्यात येतील असे ही स्पष्ट केले होते त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ हे निवेदन आदेशीत केल्याने वसईच्या आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार व्यक्त केले
सोबत वसईच्या विकासासाठी, नागरिकांच्या हितासाठी आमचे प्रयत्न अखंड सुरूच राहतील,” असे शेवटी वसईची संघर्षकन्या आम. स्नेहा दुबे-पंडित यांनी स्पष्ट केले.

 

विधानसभेत आपल्या वसई विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडताना…

वसईच्या संघर्षकन्या आम स्नेहाताई दुबे पंडित यांनी उपस्थित केलेली महत्त्वाची निवेदने !

१) वसईतील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याची समस्या

२) महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे वसई तालुक्यातील औद्योगिक व व्यापारी आस्थापनांवर गंभीर संकट ओढवले आहे. त्यामुळे या समस्येचे त्वरित समाधान होणे आवश्यक.

३) अर्नाळा ते अर्नाळा किल्ला या बेटावरील जलमार्गासाठी पूल (Bridge) उभारणे

४) दळणवळण सुलभ करण्यासाठी MMRDA च्या माध्यमातून पूल उभारण्याची मागणी करण्यात आली.

५) वसई-विरार महानगरपालिकेतील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणे

६) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडे प्रस्तावित असलेल्या कामांना तातडीने मंजूरी देऊन कामे लवकर सुरू करावीत, याबाबतही निवेदन देण्यात आल्याचे आम. स्नेहाताई दुबे पंडित यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे

 

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!