“बहुप्रतिक्षित अशा वसई पंचायत समितीची ऐतिहासिक आमसभा उत्साहात संपन्न झाली, खास वैशिष्ट्य म्हणजे ही आमसभा तब्बल १० वर्षांनंतर आयोजित करण्यात आली हे विशेष होतं “
वसई :- आशिष राणे
वसई तालुक्यात २०१४ नंतर प्रथमच बुधवार दि ४ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बहुप्रतिक्षित अशा वसई पंचायत समितीची ऐतिहासिक आमसभा उत्साहात संपन्न झाली
वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली वसई पंचायत समितीच्या आमसभेचे सर्व विभागाना एकत्रित आणत माणिकपूर स्थित यंग मेन्स कॅथॉलिक असोसिएशन ( YMCA ) च्या सभागृहात या सभेचं आयोजन यशस्वीरित्या पार पडले.

दरम्यान वसईत विधानसभा मतदारसंघात नेतृत्व बदल झाल्यावर तथा एका दशकाच्या कालावधीनंतर पहिल्यादाच ३१ ग्रामपंचायतीचे सरपंच,पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी , गावकरी सर्व शासकीय विभागाचे विभागप्रमुख ,आदी वसई पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचारी वर्गास सोबत घेऊन जनतेच्या उल्लेखनीय उपस्थितीत ही आमसभा पार पडली.
विशेष म्हणजे आमदार म्हणून ऑक्टोबर २०२४ ला निवडून आल्यानंतर आम स्नेहाताई यांची ही पहिलीच वसई पंचायत समिती अंतर्गत वार्षिक आमसभा होती.
या आमसभेच्या अध्यक्षा तथा आम. स्नेहाताई दुबे पंडित यांनी वसईत कार्यरत विविध शासकीय विभागांचा सविस्तर आढावा घेतला आणि वसईच्या सर्वांगीण विकासासाठी शक्य होईल तसे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

एकुणच या आमसभेत जनतेकडून उस्फुर्त प्रश्न सूचना निवेदन व भेडसावत असलेल्या समस्या त्याचे निराकरण अर्थात शासकीय प्रमुख विभागांचा आढावा घेण्यात आला,
यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, वसई विभाग, एस.टी. आगार व्यवस्थापन,वसई, तहसिलदार कार्यालय ,दर निरीक्षक, वसई,आरोग्य, शिक्षण विभाग, पंचायत समिती तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आदी विभागाचा आढावा घेतला.
या बैठकीमध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, जलव्यवस्थापन आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर सखोल चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने आम स्नेहाताई यांनी स्थानिक नागरिकांच्या विविध समस्यांवर समोरून आलेल्या प्रश्न व सूचना तक्रारी संदर्भात थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून याबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश ही दिले.
वसईच्या विकासाचा दृढ संकल्प या आमसभेद्वारे अधोरेखित झाला असून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासन प्रशासन एकत्र येऊन कार्यरत राहील, असा विश्वास वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी व्यक्त केला.
या आमसभे प्रसंगी आम. स्नेहा ताई दुबे पंडित,आमसभा सचिव तथा प्रशासकतथा गटविकास अधिकारी वसई , प्रदीप डोलारे, नायब तहसीलदार शशिकांत नाचन, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच-उपसरपंच, मंडळ अध्यक्ष, पक्षांचे पदाधिकारी, वसईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“वसईच्या विकासाचा दृढ संकल्प या आमसभेद्वारे अधोरेखित झाला असून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासन प्रशासन एकत्र येऊन कार्यरत राहील, “
आमसभा अध्यक्षा तथा आम. स्नेहा ताई दुबे पंडित
वसई विधानसभा सदस्या
![]()
