वसुंधरेच्या संवर्धनासाठी “गो ग्रीन” सेवेचा पर्याय निवडा आणि  वीजबिलात एकरकमी 120 रुपये सूट मिळवा  !

 

 मुंबई :- 

वसुंधरेच्या संवर्धनासाठी ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडावा, असे महावितरणचे आवाहन आहे. दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल स्वीकारण्याच्या गो ग्रीन सेवेचा पर्याय  निवडल्यानंतर ग्राहकांना तत्काळ वीज बिलात एकरकमी  120 रुपये सूट महावितरणकडून दिली जात आहे.

महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय पहिल्याच वीज बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ 120 रूपये एकरकमी सवलत देण्यात येते.

महावितरणच्या 3 कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत 6 लाख 16 हजार ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळपणे 120 रुपये  एकरकमी सुट देण्याचा निर्णय घेतला. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात आले आहेत. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येत आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येणार आहे.

ग्राहकांनी  वसुंधरेच्या संवर्धनासाठी या योजनेचा लाभ  घेण्याचे महावितरणने आवाहन केले आहे. गो ग्रीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीन चा पर्याय निवडा असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई यांनी केलं आहे

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!