वसई :- आशिष राणे
वसईच्या माणिकपूर येथील समाज उन्नती मंडळ सभागृह येथे रविवार दि १ जून २०२५ रोजी सक्षम फाऊंडेशन, वसई यांचे विद्यमाने कवि अनिल गुरव यांच्या “ मनातलं काहिसं…” या कविता संग्रहाचे शानदार प्रकाशन संपन्न झाले.
या सोहळ्यानंतर याठिकाणी काव्यसंमेलनाचा तसेच सुश्राव्य शास्त्रीय संगीताचा ही सदाबहार कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाल्याची माहिती अश्विनी गुरव यांनी दिली
दरम्यान काव्य संमेलन व सुश्राव्य शास्त्रीय संगीत कार्यक्रमा
मध्ये सर्वश्री कवी अनिल गुरव, कवी अनंत सुतनासे, कवी सूरज भोईर,कवयित्री वर्षा शेट्ये तसेच विदुषी सौ. माया मोटेगावकर यांचा देखील सहभाग होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन दिप्ती जोशी यांनी केले.
या प्रकाशन सोहळ्याकरीता वसई विरार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक, कवी सायमन मार्टीन, गझलकार डॅा. संतोष कुलकर्णी तसेच रसिकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
![]()
