वसई :- आशिष राणे
वसई स्थित तथा संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची पुस्तकें प्रकाशित होतात अशा अशोकजी मुळे यांच्या डिंपल पब्लिकेशनतर्फे पुन्हा एक विक्रमी पाऊल पुढें टाकले आहे चक्क ओ पी नय्यर साहेबांच्या जन्मशताब्दीवर्षा निमित्ताने “तुमसा नही देखा” या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न होत आहे
दरम्यान हा पुस्तक प्रकाशन सोहळा येत्या रविवार दि. ८ जून २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता गोरेगाव पूर्व येथील नंदादीप शाळा, वातानुकूलित सभागृह,येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असून या पुस्तकाचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या पुस्तकाचे संपादन प्रदीप देसाई आणि मंदार जोशी यांनी केले आहे.
तसेच या कार्यक्रमात ओ पी नय्यर साहेबांची गाजलेली वा अन्य मंत्रमुग्ध करणारी सदाबहार गाणी देखील सादर केली जाणार आहेत त्यामुळे साहित्य असो की पुस्तक प्रेमी वाचक वर्गांनी अगदी सर्वानीच या कार्यक्रमासाठी अगत्याने उपस्थित राहण्याच आवाहन डिंपल प्रकाशन तर्फे करण्यात आले आहे
![]()
