देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तापाई ,सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर
वसई :- आशिष राणे
आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांची पाऊले पालख्या बरोबर पंढरपूरच्या दिशेने पडली आहेत.
जे पांडुरंगाचे भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाहीत अश्याना दिंडी, पालखी सोहळा वसई मध्ये अनुभवता यावा यासाठी साहित्य जल्लोष प्रतिष्टान आणि यंगस्टार ट्रस्ट दरवर्षी आषाढी निमित्ताने अभांगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करत असते. त्यावेळी काढण्यात येणारी दिंडी आणि पालखी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. यावर्षी हा सोहळा वसई येथील क्रीडामंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
आषाढी एकादशी निमित्त “ आषाढ घन सावळा “ हा अभंगवाणी कार्यक्रम ६ जुलै २०२५ ला सायंकाळी ५ ३० वा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संद्याकाळी ४.३० वाजता विठ्ठल नामाचा गजर करत वसईतील गुजराथी शाळे जवळील विठ्ठल रखुमाई मंदिरातून वारकरी दिंडी आणि पालखी निघणार आहे. ती क्रीडा भवन येथे पोहोचल्या नंतर
सांयकाळी – ५.३० वाजता क्रीडा भवनच्या आप्पा पेठे सभागृहात आषाढ घन सावळा हा अभंगवाणीचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कर्यक्रमात सारेगम फेम अभिषेक मारोतकर , सारेगम आणि सूर नवा धस नवा विजेता अनिरुद्ध जोशी, केतकी भावे -जोशी,आरजे अमित काकडे,लिटिल स्टार स्वानंदी केळवेकर आणि निर्माता दिगदर्शक योगेश केळवेकर सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर दिंडीत बाल समाजोन्नती भजन मंडळ ,किरवली व मोरया महिला भजन मंडळ उमेळे हे सहभागी होणार आहेत. या वारकरी दिंडीत सगळ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आले आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सपत्नी सह विठुरायाच्या चरणी नंतमास्तक ; राज्याचे भले कर
विरार शहरात आषाढी एकादशीला भाविकांची लक्षणीय उपस्थिती : प्रति विठ्ठल रखमाईच्या दिंडीला
सर्वत्र विठू नामाचा गजर दुमदुंमला

विरार येथे आषाढी एकादशी निमित्ताने उमेश दादा गोवेकर ह्यांनी आयोजित केलेल्या भव्य दिंडी मध्ये जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर आणि तालुका प्रमुख सुदेश चौधरी आणि मोठ्या प्रमाणात भाविक या दिंडीत सहभागी झाले होते
![]()
