वसई रोड भागातील स्कायवॉकच्या छताखालच्या फायबर शीट निखळल्या : मोठी दुर्घटना टळली

भविष्यातील मोठे अपघात टाळण्यासाठी संपूर्ण स्कायवॉकच्या स्ट्रॅक्चरल ऑडिटची  मागणी यां घटनेने आता अधोरेखित होत असून वसईच्या आमदार स्नेहाताईंनी याबाबत विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केलं जातंय…!
वसई : -आशिष राणे

वसई रोड पश्चिमेच्या स्टेशन भागात 2009 साली तयार करण्यात आलेल्या विनावापर धुळखात पडलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूस बसविलेल्या फायबर शिट अचानक खाली निखळून पडल्याची दुर्देवी घटना धडल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बुधवार दि 10 सप्टेंबर च्या सकाळी 7 च्या सुमारास वर्तक कॉलेज समोरच्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे.


नशीब बलवंत्तर म्हणून या दरम्यान कोणीही किंवा कुठलेहीं वाहन त्या स्कायवॉक खाली नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
वसई विरार शहरात वसई रेल्वे स्थानक व विरार रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांसाठी सन 2009 मध्ये महाकाय असे स्कायवॉक तयार करण्यात आले,तर स्कायवॉकच्या खालील बाजूस फायबरच्या शिट (एसीपी पॅनल ) बसविण्यात आल्या होत्या.

बुधवारी अचानकपणे वसईच्या वर्तक कॉलेज गेट समोर असलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूच्या फायबर शिट निखळून खाली पडल्या.

या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून लोंबकळत असलेल्या व धोकादायक स्थितीत असलेल्या फायबर शिट त्यांनी काढून टाकल्या.

रेल्वे स्थानकाला लागूनच हा परिसर असल्याने येथून प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांची ये जा सुरू असते. मात्र घटना घडली तेव्हा कोणीही स्कायवॉक खाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
सद्यस्थितीत या स्कायवॉकचा वापर फारच कमी झाला आहे. हे स्कायवॉक वापराविनाच पडून आहेत.

त्यामुळे हे स्कायवॉक धोकादायक बनत चालले आहेत.किंबहुना कोणत्याही प्रकारची अनुचित घटना यापुढे देखील घडू नये यासाठी तयार करण्यात आलेल्या स्कायवॉकचे स्ट्रॅक्चरल ऑडिट तात्काळ करण्यात यावे अशी हीं मागणी आता वसईकराकडून होत आहे.

वसईच्या आमदार स्नेहाताईं दुबे पंडित यांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता ! 


एकूणच ही घटना ज्यावेळी घडली त्या प्रत्यक्ष शीट निखळून पडताना पाहणाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया फार गंभीर व धक्का देणाऱ्या होत्या तसें जरी असले तरी हा स्कायवॉक एमएमआरडीए प्राधिकरण यांनी विकसित केला होता त्यामुळे वसई विधानसभा आमदार स्नेहा ताईंनी याबाबत थेट विशेष लक्ष घालून तात्काळ यां वसई विरार शहरातील स्कायवॉकचे स्ट्रॅक्चरल ऑडिट करून घेण्यासाठी प्राधिकरण अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत थेट पाठपुरावा केल्यास भविष्यात घडणारे अपघात बऱ्यापैकी टळतील अशी बोलकी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

यां संदर्भात वसईच्या आमदार स्नेहा ताईंची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मोबाईल द्वारे संपर्क केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!