वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

वसई विरार महानगरपालिकेत “कार्यकर्ता पर्व” : महापौरपदी अजीव पाटील आणि उपमहापौरपदी मार्शल लोपीस यांची बहुमताने निवड : कमळ कोमजलं

 

गुप्त मतदान झाले असते तर….

तर शिट्टीची ताकद समजली असती.परंतु अजून वेळ गेलेली नाही, येणाऱ्या काळात ऑपरेशन शिट्टी तुम्हाला बघायला मिळेल…अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेले नगरसेवक वसई विरारच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करतील, अगदी सर्वाना सोबत घेऊन जाणारा बविआचा एक संघटक, प्रवक्ता असलेला कार्यकर्ता तथा अपॆक्षित उमेदवार अजीव पाटील  आणि उपमहापौर हि दोन्ही पदे दिली आहेंत अर्थात सर्वसमावेशक असलेले हे दोघेही कार्यकर्ता आज वसई विरार शहरातील नागरिकांना  न्याय देतील हा विश्वास नाही तर प्रबळ आत्मविश्वास आहें…

—-माजी आम.हितेंद्र ठाकूर

वसई/विरार :- आशिष राणे 

वसई विरार शहर महानगरपालिकेची  महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज मंगळवार दु. ३ फेब्रुवारीला संपन्न झाली आणि त्यात बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नगरसेवक अजीव पाटील यांनी भाजपच्या ऍड. दर्शना त्रिपाठी यांचा 71 विरुद्ध 44 मतांनी पराभव केला.

आणि ते अखेर महापौरपदी निवडन आले. तर मार्शल लोपीस यांनी भाजपच्या नारायण मांजरेकर यांचा पराभव करून ते उपमहापौर पदी निवडून आले.आणि पालिकेत “अजीव पर्व” सुरू झाले, आणि आज अजीव पाटील हे पालिकेचे सातवे महापौर ठरले आहेत.

वसई विरार शहर महानगरपालिकेची 5 वर्षांपासून रखडलेली निवडणूक होऊंन यात बहुजन विकास आघाडी पूर्ण बहुमताने निवडून आली होती. आज निवडणूक पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक संपन्न झाली

पीठासीन अधिकारी यांच्या समवेत  पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी तसेच या सभागृहाचे कामकाज नगर सचिव विश्वनाथ तळेकर यांनी पाहिले. निवडणूक होत असलेल्या सभागृहाच्या बाहेर आणि मुख्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सभागृहचे कामकाज सुरू झाल्या नंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटे देण्यात आली होती.यामध्ये बहुजन विकास आघाडी तर्फे निषाद चोरघे आणि प्रफुल साने यांनी अर्ज मागे घेतल्याने बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील आणि भाजपच्या ऍड दर्शना त्रिपाठी यांच्यात सरळ लढत होऊन अजीव पाटील हे 71 विरुद्ध 44 मतांनी निवडून आले.

या निवडीनंतर भाजपाकडून जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला तर त्याला बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकानी जय द्वारकाधीश घोषणेने प्रत्युत्तर दिले.

उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत बहुजन च्या मार्शल लोपीस यांनी नारायण मांजरेकर यांचा बहुमताने पराभव केला  सभागृहात निवडणूक सुरू असताना सभागृहाच्या बाहेर,


पालिकेचे पहिले महापौर आणि अजीव पाटील यांचे मोठे बंधू राजीव पाटील,माजी महापौर आणि जेष्ठ नेते नारायण मानकर,माजी उपमहापौर उमेश नाईक हे त्रिकुट लॉबी मध्ये बसून होते.

पीठासीन अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी महापौर उपमहापौरांची निवड जाहीर केल्या नंतर सभागृहात माजी आमदार आणि बहुजन विकास आधाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर,माजी आमदार क्षितिज ठाकूर,माजी खासदार बळीराम जाधव,माजी आमदार राजेश पाटील,ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशिनाथ पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून स्वागत आणि अभिनंदन केलं

या पूर्वी आतापर्यंत झालेले महापौर….

यापूर्वी राजीव पाटील,नारायण मानकर,प्रविणा ठाकूर,रुपेश जाधव,प्रकाश रोड्रिंक्स आणि प्रवीण शेट्टी हे होते.

पालिकेत आत बाहेर पोलीस छावणीच स्वरूप

महापौर निवडणूक होत असलेल्या ठिकाणी 12 पोलीस अधिकारी आणि 53 पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.महापौर निवडणुकीसाठी प्रथमच एवढा पोलीस बंदोबस्त पहिल्यादा दिसून आला.

कोण आहेत अजीव पाटील…?

अजीव पाटील हे पाटील कुटुंबातील दुसरे महापौर ठरले आहेत ते पक्षात संघटक व प्रवक्ते पद सांभाळून आहेत, यापूर्वी त्यांचे मोठे बंधू राजीव पाटील हे महानगरपालिका स्थापने नंतरचे पहिले महापौर झाले होते.अजीव पाटील हे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे  अत्यंत निकटवर्ती असून  नात्याने ते आत्ये भाऊ आहेत.अजीव पाटील हे यंग स्टार ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक सामाजिक,शैक्षणिक,आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहेत. सर्वांना बरोबर घेऊन वसई विरारच्या विकासासाठी प्रयत्न करणारे  आणि  गेल्या अनेक  वर्षा पासून येथील रखडलेल्या विकासाच्या योजनांना लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली चालना देणारे जेष्ठ कार्यकर्ते म्हणून ठरले आहेत त्यामुळे हिच त्यांच्या या कार्याची पोच पावती आहें…✅💯

 

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!