विरार – प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्याच्या तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क आदेश नुसार वसई विरार महापालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध 71 लोकसेवा तसेच नियत कालमर्यादा , पदनिर्देशित , अधिकारी प्रथम आणि द्वितीय अधिकारी यांनी 71 बाबी अधिसूचित केलेल्या “आपले सरकार सेवा केंदाचे” उद्घाटन “जी “प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांच्या हस्ते मंगळवार दि. 29 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले यावेळी पालिकेचे अधिकारी व नागरिक उपस्तित होते.
या लोकसेवे मध्ये जन्म प्रमाणपत्र देणे , मृत्यू प्रमाणपत्र देणे , विवाह नोंदणी प्रमाण पत्र देणे ,मालमत्ता कर उतारा देणे, थकबाकी नसल्याचा दाखला देणे , दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे , वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे, झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, बांधकाम परवाना देणे , भोगवटा प्रमाणपत्र देणे , नळजोडणी प्रमाणपत्र देणे, जल निसारण जोडणी प्रमाणपत्र देणे , अग्निशमन ना हरकत दाखला देणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे आदी अनुष्णगिक इतर सुविधा सहकार सेवा केंद्रावर दिल्या जाणार आहेत तरी नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रभाग समिती ” जी ” वालीवचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांनी केले आहे.
![]()
