वसई-विरार शहराच्या सुनियोजित विकासांत वास्तुविशारद ( Architect ),अभियंते (engineer’s) यांची अभ्यासू भूमिका अत्यंत महत्त्वाची — महापौर अजीव पाटील
विरारच्या आई जीवदानी गडावर उभारली १५०० फूट उंचीची अद्भुत ‘ग्लास गॅलरी’ ; भक्तांना दिसणार सफाळे ते उत्तन परिसरातील अरबी समुद्राचं विहंगम दृश्य एकाच दृष्टिक्षेपात…
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.(भा.प्रा.से ) यांची नियुक्ती : पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात..
वसई पोलिसांनी काढलेला जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी -झोन २ कार्यालयावर धडक मोर्चा
विरार मध्ये “शारदा हाईट्स” इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग ; 9 जणांची केली सुखरूप सुटका

वसई तालुका पत्रकार संघा’च्या शिष्टमंडळाच्या भेटीसाठी “होळीचा दिवस ” ठरला सकारात्मक दिवस..!

 

महापौर -उपमहापौरां सोबत घेतल्या नगररचना उपसंचालक व अधिकारी वर्ग, नगरसचिवांच्या भेटी… !

वसई तालुका पत्रकार संघाच्या पाच पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सर्वप्रथम शुक्रवार दि. २ मार्च रोजी दु. ४.३० वा. वसई विरार शहाराचे नवनिर्वाचित महापौर अजीव यशवंत पाटील तसेंच उपमहापौर मार्शल लोपीस यांची विरार स्थित महानगरपालिका मुख्यालयाच्या महापौर -उपमहापौर दालनात पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन व हितगुज करीत त्यांची सदिच्छा भेट घेतली,

वसई -आशिष राणे
वसई तालुक्यात विविध वृतपत्राच्या माध्यमातून आपल्या लेखणी सोबत विविध सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असलेल्या वसई तालूका पत्रकार संघ (रजि ) यांच्या पाच पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासाठी सोमवार दि. २ मार्च रोजीचा “होळी सणा”चा दिवस उत्तम व सकारात्मक ठरलायं.

या सदिच्छा व महत्वाच्या चर्चेच्या भेटी दरम्यान वसई विरार शहराचे नवनिर्वाचित महापौर -उपमहापौर यांच्या सहित संघाने महानगरपलिका मुख्यालयातील नवनियुक्त नगररचना विभागाचे उपसंचालक व अन्य अधिकारी वर्गा सहित पालिका नगर सचिवांची देखील भेटी घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली आणि अखेर सोमवार आणि त्यात होळी सणाचा पवित्र दिवस संघासाठी उत्तम व सकारात्मक ठरल्याची आनंदी प्रतिक्रिया संघाच्या वतीने देऊ केली आहे.

वसई तालुका पत्रकार संघाच्या पाच पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सर्वप्रथम शुक्रवार दि. २ मार्च रोजी दु. ४.३० वा. वसई विरार शहाराचे नवनिर्वाचित महापौर अजीव यशवंत पाटील तसेंच उपमहापौर मार्शल लोपीस यांची विरार स्थित महानगरपालिका मुख्यालयाच्या महापौर -उप महापौर दालनात पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन व हितगुज करीत त्यांची सदिच्छा भेट घेतली, या भेटी वेळी दालनात वसई तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष संदीप पंडित, सचिव आशिष राणे,खजिनदार अरुण सिंग,उपाध्यक्ष भरत म्हात्रे,आणि कार्यकारी सदस्य आनंद गदगी आवर्जून उपस्थित होते.

नगररचना उपसंचालकांनी अभ्यांगत- वास्तुविशारद – अभियंते यांच्या भेटीचे नेमके नियोजन करावे —✅

दरम्यान संघाच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे नुकतेच सोलापूर जिल्ह्यातुन थेट वसई विरार महानगरपालिकेत नियुक्त झालेले नगररचना विभागाचे उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांची ही भेट घेतली आणि त्यांच्याशी नगररचना विभागाच्या एकूणच कामकाजा संदर्भात चर्चा केली,

यावेळी संघाचे विद्यमान सचिव आशिष राणे यांनी उपसंचालकांनी त्यांना दुपारी भेटायला येणारे अभ्यांगत, पत्रकार मंडळी आणि त्याचवेळी शहरातील वास्तुविशारद, अभियंते व पालिका अभियंते -अधिकारी वर्ग यांच्या भेटीची नेमकी वेळ निश्चित करावी जेणेकरून अभ्यांगत, पत्रकार मंडळी यांना दालना बाहेर ताटकाळत उभे राहता येऊ नये, त्यामुळे उपसंचालकांनी त्यांच्या विभागात नेमके भेटीचे नियोजन आणि वेळापत्रक तयार करावे,याकडे प्रकर्षाने लक्ष वेधले.

यावर उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांनी संघाला सकारात्मक आश्वासन तर दिले मात्र त्यांनी सांगितलं कीं, मला वसई विरार महापालिकेत (सोमवार ते बुधवार ) प्रत्यक्षात तीन दिवसच इथे काम करायला मिळतात, उर्वरित तीन दिवस मी सोलापूर महापालिकेत असतो, अर्थात जरी माझी बदली वसई विरार महापालिकेत झाली असली तरी माझ्याकडे सध्या नगररचना उपसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार असल्याचे भिष्णूरकर यांनी शिष्टमंडळाशी बोलताना स्पष्ट केले.

दुसरीकडे नगर सचिव विश्वनाथ तळेकर यांची ही भेट घेतली असता त्यांच्या कडून पालिका सभा, सर्व साधारण सभा,महासभा, येणारी स्थायी सभापती निवड, तसेच अर्थसंकल्प आणि त्यानंतर प्रभाग समिती सभापती निवडणूक आदी बाबत सविस्तर माहिती विषद केली…
*****

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!